आपलेच फितूर झाले….!
आपले काही बोटावर मोजण्या इतके मराठा नेते जे आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यातील कोकणातील एक जण ,स्वतःच्या दहा पिढ्या बसून खातील एवढं कमावयल्यानंतर स्वतःच्या मुलांसाठी तिकीट मिळाले नाही म्हणून ढसाढसा रडत होता. आरक्षण मुद्यावर ह्यावेळी तो माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षणाला सुद्धा विरोध करत आहे.खर तर लाज वाटते आम्हाला यांना हे आमचे मराठा नेते आहेत म्हणायची.अजून एक जण कायद्याचा धाक दाखवतो.
अरे तुम्ही जे काही ह्या राज्याची आणि लोकशाहीची वाट लावलीय ना . त्यात एक ही पक्ष धुतल्या तांदळा सारखा नाही. हमाम मे सब नंगे . कुठलीही विचार धारा नसणार सरकार मग ते आघाडी च असो आणि आता बिघडलेल्या आघाडीतील तिघाडीच असो. ते मात्र तुम्ही बरोबर कोर्टात जाऊन कायद्याच्या चौकटीत अगदी घटनाबाह्य असलं तरी त्याला पद्धतशीर करून घेता.फक्त आरक्षण म्हंटल की कायदा समित्या आयोग आडवा येतो का?
अजून एक संस्थनिक ही काही तरी आरक्षण ह्या विषयावर बरळले कदाचित दिल्लीवरून मुख्यमंत्री पदाची ऑफर ही असेल . फक्त आरक्षणाच्या विरोधात बोला म्हणून. झाले हे सुरू अरे यांना यांचं हित समजत रे तुमचं नाही. मुळात यांना फक्त यांची सतरंजी आणि झेंडे उचलणारे हवे यांची हेलिकॉप्टर हवेतूंन आली की आम्ही कसे राजे आहोत आमचा युवराज कसा रुबाबात फिरतोय हे दाखवायचं आहे. अरे तुमचा युवराज हेलिकॉप्टर मध्ये फिरतोय मराठा असल्याचा अभिमान होता. पण आता नाही. शिक्षण सम्राट म्हंटल्यावर तर तुमचा जोरदार व्यवसाय आरक्षण आलं तर डोनेशन कमी होणार . सगळं समजलं साहेब.तुमच्या वर होता तो विश्वास गमावला. पंतप्रधान येत असतील पण मराठा तिकडे फिरकत ही नसतो.
अजून एक जण त्यांना तर आम्ही आमचा खरा नेता मानायचो हा कायम आपल्या बाजूने बोलतोय पण साहेब तुमचं बोलणं कुठ तरी तुम्ही दबावाखाली बदललं .आज वर जी भूमिका होती तिला फारकत घेत सरळ सरळ वेगळे विचार फक्त आणि फक्त दिल्ली कर मंडळी साठी जर बदलत असाल तर साहेब कश्याला हवं ते मंत्री पद मराठानेता म्हणून जी उपाधी पाठी लागते ना ती ह्या मंत्रीपदावरून किती तरी मोठी आहे.
बाकी अजून ही काही वळवळतील पण ध्यानात ठेवा आरक्षण ,आणि त्यातून उडालेली ठिणगी तुमचं राजकीय करियर कधी भस्मसात करेल हे तुम्हाला ही कळणार नाही. जनता असो समाज असो ,नेहमी पर्याय शोधत असते आणि आरक्षण मिळालं नाही तर पर्याय दृष्टिपथात आहे. ह्याची जाणीव ठेवा बोलले ते बोलले इथून पुढे तुम्ही ही आणि इतर मराठा नेते समर्थन करत नसाल तर ठीक पण तोंड बंद ठेवा. हिंसाब होईल .
कारण माझ्या गोरगरीब मराठा समाजाला मिळणार आरक्षण खूप जवळ आलय. त्यावर तुमच्या बकवास बोलण्याने आमच्या तळ पायाची आग मस्तकात जाऊन मेंदूला झिणझिण्या येतायत. त्या मुळे ठिणगी पडली भडका होऊ देऊ नका शांत आणि संयमी असणारा समाज का उगाच नको ते बोलून पेटवत आहात.
आरक्षण तर मिळणार आणि मिळणार आणि नाही मिळालं तर आम्ही कस मिळवायच ते ही शिकलोय.
-अशोक पवार