कधी नव्हे…!
कधी नव्हे…!
इतकी राजकीय परिस्थिती
बिकट आहे
मशालीच्या जोडीला तुतारी
आणि हात आहे..
“कमळ” उसन अवसान आणून
उगाच फुलत आहे
मालक सोडून धनुष्य दुसऱ्याच्या
खांद्यावर दिसतो आहे
चोरलेल्या घड्याळा कडे कुणी
लक्षच देत नाही
वाह रे आपली बुलंद लोकशाही..
मतदार राजा विचार कर
ही वेळ पाच वर्षे पुन्हा नाही, पुन्हा नाही…..
-अशोक पवार