अवघ्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या राज्यासह देशभरातील आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी चालवलेली असून त्यामध्ये मात्र सर्वच पक्षाकडुन योग्य आणि बंजारा उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. कारण हा लोकसभा मतदारसंघ बंजारा बहुल असून येथील मतदारांची संख्या निर्णायक भूमिका वठवणारी आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून बंजारा समाजातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. कालपरवा दिल्ली मध्ये झालेल्या भाजपाच्या पक्षश्रेष्ठीकडून सुमार कामगिरी असलेल्या खासदारांना नारळ देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चाचपणी सुरू असल्याचे विश्वसनीय गोटाकडून कळलेले आहे. यामध्ये अशीही माहिती मिळाली आहे की, भाजपाच्या गोटयामध्ये सन 2019 मध्ये एक लाखाच्यावर मतदान मिळवणारे इंजिनीयर प्रवीण पवार यांच्या नावाला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जवळपास हिरवी झेंडी दाखवल्याचे नागपूर वरून गुप्त माहिती कळते.
येणारी लोकसभा ही सगळ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केली असून प्रत्येक मतदारसंघांमध्ये योग्य उमेदवार शोधण्यासाठी त्यांनी आपल्याच एजन्सी कडून सर्वे सुरू करुन घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभा असताना मात्र भाजपाने 45 लोकसभेच्या सिटावर लक्ष केंद्रित केलेले असून भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नडडा यांनी मागच्या मुंबई दौऱ्याप्रसंगी 45 सिटा निवडून आणण्याचे लक्ष दिले आहे. तर उर्वरित असलेल्या तीन सिटा म्हणजे त्यामध्ये यवतमाळ, हिंगोली या दोन्ही बंजारा समाजासाठी आणि बारामती हे जाणता राजा शरद पवार साहेबासाठी सोडल्याचे तर नाही ना? असेच त्यांच्या बोलण्याचा राजकीय जाणंकार अर्थ काढत आहे.काल भाजपाने आपल्या पक्षातील कार्यकर्त्याची सभा घेऊन राज्यातील सुमार कामगिरी असलेल्या भाजपा खासदाराचे तिकीट कापण्याची शक्यता वर्तवलेली असून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी त्यांची चाचपणी सुरू असल्याचे विश्वसनीय माहिती सूत्राकडून कळलेली आहे. आणि राज्यातील दौरे देखील वाढलेले असून भाजपाकडून प्रत्येक उमेदवाराचे रिपोर्ट कार्ड बनवल्या जात आहे. सध्या भाजपाकडे नाईक घराण्यातील वसंतराव नाईक यांचे नातू एडवोकेट निलयभाऊ नाईक हे प्रबळ दावेदार असून त्यांच्या खालोखाल मागच्या निवडणुकीत एक लाख मतदान घेणारे इंजिनियर प्रवीण पवार सर हे सुद्धा शर्यतीत आहे.ऐन वेळेवर पक्ष कोणाला तिकीट देते हे मात्र आज तरी सांगता येत नाही.पंरतु प्रविण पवार यांनी संपूर्ण तयारी सुरू केलेली असुन काही दिवसांत संपूर्ण यवतमाळ लोकसभा मतदारसंघात त्यांचें बॅनर झळकतिल.
शिवसेना शिंदे गटाकडून राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय संजयभाऊ राठोड यांच्या नावाची चर्चा सुरू असून भाजपा कडुनच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना मा. संजयभाऊ राठोड कॅबिनेट मंत्री यांना उभे करत असाल तर भाजपा यवतमाळ मतदार संघावर दावा करणार नसल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. असे जर झाले तर मा.संजयभाऊ राठोड यांच्या मतदारसंघातील कामे आणि त्यांचा लोकांचा दांडगा जनसंपर्क बघता ते सुद्धा प्रबळ उमेदवार ठरू शकतात. पोहरागड आणि उमरीगड येथील 593 कोटीच्या विकास कामामुळे भाऊवर जनता जाम खुश असुन संत सेवालालबापु चमत्कार घडवु शकते. पंरतु मा.संजयभाऊ राठोड हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव गोरबंजारा समाजाचे दमदार मंत्री असल्यामुळे त्यांची गरज महाराष्ट्रातच आहे. त्यांनी महाराष्ट्रातच राहावे अशी जनभावना आहे. महाराष्ट्रातील राजकारणात कितीही उलथापालथ झाली आणि कोणाचेही सरकार आले तरीही मा.संजयभाऊ राठोड हे कॅबिनेट मंत्री राहणारच ही तेवढीच गोष्ट लक्षात ठेवा.
शिवसेना (उबाठा) गटाकडून पोहरागडाचे महंत सुनील महाराज यांची सुद्धा संपूर्ण तयारी असून त्यांना सुद्धा मैदानात उतरण्यासाठी मागच्या आठवड्यातील मुंबई दौऱ्याप्रंसगी मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी तयारीला लागा असे संकेत दिल्याचे कळते. त्यामुळेच ते जोरदार तयारीला लागलेले असुन ते सुद्धा प्रबळ उमेदवार ठरू शकतात. कारण पोहरागड हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असुन मंहत लोकांना मानणारा फार मोठा वर्ग सर्वच जातीधर्मात असल्यामुळे ते सुद्धा प्रबळ उमेदवार ठरू शकतात. तसेच मा.उद्धवजी ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीचा सुद्धा फायदा त्यांना होऊ शकतो.त्यामुळे त्यांनी सुद्धा संपूर्ण तयारी केलेली आहे
.
जर भविष्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (गट) यांची युती झाली नाही. तर काँग्रेस कडून माणिकराव ठाकरे किंवा शिवाजीराव मोघे या पराभूत आमदारांना तिकीट न देता काँग्रेस श्रेष्ठी नवीन चेहरा म्हणून देवानंद पवार यांना मैदानात उतरू शकते. आणि यासाठी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे सर्व शक्ती पणाला लावु शकतात. आणि काँग्रेसच्या हवा नुसार तेही दमदार उमेदवार राहू शकतात. राष्ट्रवादीकडून आयत्या वेळेवर अजित दादा पवार हे सौ. मोहिनीताई इंद्रनील नाईक यांना सुद्धा यवतमाळ लोकसभेसाठी उभे करू शकतात.
सध्या यवतमाळ लोकसभा करिता गोर बंजारा समाजातील जवळपास 12 ते 13 उमेदवाराची तयारी सुरू असून काही लोकांनी मतदारसंघात दौरे सुरू केले असुन दौऱ्याचा तपशील (टाईम लाईन) सोशल मीडियावर टाकत आहे. पंरतु यापैकी वेळेवर कोणाला तिकीट मिळते हे मात्र आज तरी सांगणे कठीण आहे. एकंदरीत सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील मागच्या दोन महिन्याच्या जर चर्चा बघितल्या तर शिवसेना शिंदे गटाकडून मा.मंत्री संजयभाऊ राठोड, भाजपा पक्षाकडून एडवोकेट निलयभाऊ नाईक किंवा इंजिनियर प्रवीण पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पोहरागडाचे महंत सुनील महाराज यांचीच उमेदवारी जवळपास फायनल असल्याचे आज तरी लोक सांगत आहे. कालच्या साम मराठी वुत्त वाहिनीवर प्रसारित झालेल्या बातमीनुसार जर शरद पवार साहेब दसऱ्यापुर्वी भाजपावाशी झाले. तर अजितदादा गट सुद्धा भाजपामध्ये विलीन होईल. तर मात्र यवतमाळ लोकसभेचे राजकीय कॅल्क्युलेशन झटकन बदलून सरळ ते गुजरात वाया दिल्ली वरून सौ. मोहिनीताई इंद्रनील नाईक यांची उमेदवारी फायनल होऊ शकते. याचे कारण असे की, सौ. मोहिनीताई यांचे वडील के.जी. बंजारा हे गुजरातचे भाजपाचे एकनिष्ठ आणि विश्वासु कार्यकर्ते असून मोठे काका पोलीस महासंचालक डी.जी वणजारा हे पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमितजी शहा यांच्या गुड बुक मधील विश्वसनीय अधिकारी म्हणून त्यांची सर्व दूर ओळख आहे.त्यामुळे सौ.मोहनीताई इंद्रनील नाईक यांचीही उमेदवारी फायनल होऊ शकते .याची शक्यता नाकारता येत नाही. असे जर झाले तर सौ. मोहिनी इंद्रनील नाईक विरुद्ध महंत सुनील महाराज अशीच लढत होईल? बघूया घोडा मैदान समोर आहे.
एकमात्र नक्की या वेळेस यवतमाळ लोकसभा मतदारसंघात बंजारा उमेदवारच बाजी मारेल कारण कितीही बंजारा उमेदवार उभे जरी झाले तरीही दमदार पक्षातील वजनदार उमेदवारालाच मतदार मतदान करतिल अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात बंजारा उमेदवाराची संख्या दिवसेंन दिवस वाढत असुन सध्या १२ ते १३ उमेदवार बाशिंग बांधून बसलेले आहे.पंरतु तिकीट मात्र कोणाला मिळते हे सध्या सांगणे अवघड आहे. तूर्तास एवढेच बाकी पुढच्या भागात अजूनही विश्वसनीय लोकसभेतील रागरंग पाहूया…वाचुया!
धन्यवाद !
-याडीकार पंजाबराव चव्हाण
पुसद -94 21 77 43 72