नंदीबैल…
डम डम वाजवत वाजवत नंदीबैलासह पाच सहा माणसं येतात. विचारलेल्या प्रश्नांना होकार आणि नकाराची मान डोलवत हा देखणा नंदीबैल मनमोहून टाकतो. नंदीबैलाची भरभक्कम शरीरयष्टी व भलीमोठी शिंगे त्याचा रुबाब आणखीन खुलवत असतात. सोबत असणारी मंडळी गोड कणखर आवाजात आरोळी देतात…
“महादेव आला…
महादेवाचा नंदीबैल आला.
बाळुमामाच्या वारीतला नंदीबैल आला.
नवसाला नंदीबैल पावातो.
देवाची आवड करायला या.
देवाला चपाती चारायला या.
तांदुळ चारायला या.
ताई गुरुवार करीत जा.
मालकाच्या पाया पडत जा.
कष्ट खुप करता, पण यश नाही बघा तुम्हाला. शनिवार करीत जा. आईबापाच्या पाया पडीत जा.
यंदा लगिन हुनार बघा तुमचं.
मोठा होऊन पोरगा लव्हमॅरेज करणार.
घरातल्या अडीअडचणी सांगणार.
दोषाचं निराकार करणार….”
असं बरंच काही ऐकवत ऐकवत ह्या मंडळींची दीनचर्या ह्या गावातुन त्या गावात सुरु असते. वर्षातुन एकदातरी ही संस्कृती दारातून जाते आणि मन भारावून टाकते.