करजगाव येथे संगीतमय श्रीमद् भागवत सप्ताह
गौरव प्रकाशन दारव्हा (प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या श्री संत देविदास महाराज समाधी संस्थान करजगाव येथे संगीतमय श्रीमंत भागवत सप्ताहाचे आयोजन २५ ते ३१ डिसेंबर पर्यंत करण्यात आले असून भागवताचार्य सौ. सोनाली महाजन आळंदीकर (पुणे ) यांच्या मधुर वाणीतून आयोजन करण्यात या आले आहे.१ जानेवारी सकाळी ति साडेसहा वाजता श्रीच्या चरणाचे ल पादुका व ग्रंथादिंडीची मिरवणूक ता गावातून निघणार असन संत या मेळावा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठाचा कार्यक्रम होऊन श्री संत पितांबर महाराज हरिपाठ मंडळ कोंडोली यांच्या माध्यमातून होणार असून यामध्ये दररोज दैनंदिन कार्यक्रम सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. २५ डिसेंबरला सायंकाळी आठ ते ११ हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज कांडोली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम असून २६ ला हरिभक्त परायण रमेश महाराज दुधे पाळोदीकर यांचे कीर्तनाचे कार्यक्रम तर २७ डिसेंबर रोजी हरिभक्त परायण महादेव महाराज शेंडे पंढरपूर यांचा भारुडाचा कार्यक्रम आयोजन केले आहे. आणि २८ डिसेंबरला सुप्रसिद्ध गायक संविधान मनोहरे अमरावती यांच्या भक्ती गीताचा कार्यक्रम आयोजन केले आहे. २९ ला हरिभक्त परायण सो नागेश्वरी ताई झाडे आळंदीकर पुणे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम असून ३० डिसेंबरला आवाजाचे जादूगार हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी रूपाली ताई सवणे पातुरकर. यांचे कीर्तनाचा कार्यक्रम असून १ जानेवारी रोजी सकाळी साडे साडेसहा वाजता जय विश्वेश्वर विश्ववाई वारकरी सांप्रदायिक हरिपाठ मंडळ तरनोळी यांचा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ता.)