वडनेर गंगाईला खासदार डॉ. अनिल बोंडेनी दिला मोठा सन्मान
* मालाताई डोईफोडे भाजपच्या उपाध्यक्षपदी
* परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण
दर्यापूर : राज्यसभेचे खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी वडनेर गंगाईला मोठा बहुमान दिला आहे. आदर्श शिक्षिका मालाताई अंबादास डोईफोडे यांच्या रूपाने तो सन्मान मिळाला आहे.
भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षपदी डोईफोडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तालुक्यातील वडनेर गंगाई येथील मलाताई डोईफोडे या विकास विद्यालय येथे शिक्षिका म्हणून अध्यापन करत होत्या. त्यांच्या परिवाराला गुरुदेव सेवा मंडळाची मोठी पार्श्वभूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी शाळेतील अध्यापनासोबतच त्या सामाजिक कार्यात त्यांचे बंधु डॉ.अनिल गाडखे यांच्यासोबत कार्यरत होत्या. गावात विविध सार्वजनिक उपक्रम राबवून नागरिकांमध्ये बंधू भावाचे वातावरण निर्माण करण्यात त्या सदैव अग्रेसर असतात. विकास विद्यालयातून सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांच्या सामाजिक कार्यात खंड पडला नाही.
त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल राज्यसभेचे खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी घेतली. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिताताई तिखिले यांना मालाताई डोईफोडे यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले होते. त्याप्रमाणे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अनिताताई तीखले यांनी मालाताई डोईफोडे यांची भारतीय जनता पक्ष अमरावती जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के, माजी गटशिक्षणाधिकारी संजय वाघमारे, संतोष मुरकुटे, पंकज कान्हेरकर, हरिष कुदेवाल,ऋत्विक गावंडे,ज्ञानपाल राऊत,सागर हरसूले,सुमित देव्हारे, आशीष बायस्कार यांच्यासह अनेक युवकांनी मलाताई डोईफोडे यांना या निवडीसाठी त्यांचे अभिनंदन केले आहे.