*शैक्षणिक संशोधनाची बाग फुलविणारे डॉ.गजानन गुल्हाने एक आदर्श संशोधक – प्राचार्य-डॉ.सुहास पाटील
* विद्यापीठातील डॉ.गजानन गुल्हाने यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन
अमरावती (प्रतिनिधी) : सत्कारमूर्ती डॉ.गजानन गुल्हाने सरांनी इतक्या कमी वर्षाच्या कालावधीत पंचवीस विद्यार्थ्यांचे गाईड होऊन मार्गदर्शन केले त्याबद्दल खरोखरच संशोधनातील उत्कृष्टतेचे हे उदाहरण आहे व शैक्षणिक संशोधनाची सुंदरशी बाग निर्माण करून त्यांनी समाजाला अर्पण केली म्हणूनच संशोधनाची बाग फुलविणारे ते एक आदर्श संशोधक आहेत. संशोधनाप्रती त्यांना खूप तळमळ होती कारण इतक्या कमी कालावधीमध्ये इतके जास्त विद्यार्थी हे कदापी शक्य नाही.सरांच्या मार्गदर्शनातून मिळालेल्या प्रेरणेमुळेच हे होऊ शकले.सरांच व्यक्तिमत्व शिक्षण विभागातील एक योग्य व्यक्तिमत्व आहे.भविष्यातील सतकार्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी सरांना शुभेच्छा.”असे विचार प्राचार्य डॉ. सुहास पाटील यांनी व्यक्त केले.
ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण विभागामध्ये कार्यरत असलेले शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गजानन गुल्हाने यांच्या हॉटेल ग्रेस इन, अमरावती येथे सेवानिवृत्तीच्या निमित्ताने नुकत्याच संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.
सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पाटील, प्रमुख अतिथी सदस्य व्यवस्थापन परिषद, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथील डॉ. साहेबराव भूकन,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी प्र – कुलगुरू डॉ.वसंतराव जामोदे सर,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉ. व्ही.बी.निमजे, जळगाव विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.एम. एल.नानकर होते तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख,डॉ.गजानन गुल्हाने यांच्या परिवारातील सर्व सदस्य त्यांच्या पत्नी सौ.नीता गुल्हाने, वडील बंधू श्री नरेंद्र गुल्हाने, जावई श्री अमर शहाडे व मुलगी सौ.नेहा शहाडे व इतर कुटुंब सदस्य,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संपूर्ण बी.एड.चे आजी माजी प्राचार्य, प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती होती.
सत्कार सोहळ्याचे उदघाटन मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केले.सर्वप्रथम अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी स्वरचित डॉ.गजानन गुल्हाने या अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून डॉ.गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनामध्ये तयार झालेल्या एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले,या सर्व विद्यार्थ्यांनी सरांच्या या सत्कार सोहळ्याचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले. सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांचा डॉ.गजानन गुल्हाने यांनी सत्कार केला.त्यानंतर श्री बाळापुरे,भटकर दादा व पंकज शर्मा यांचा सत्कार सरांनी केला.
डॉ.गजानन गुल्हाने व त्यांच्या सुविध्य पत्नीसह सत्कार पीएचडी धारक विद्यार्थ्यांनी केला.त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण विभागातील सर्व सहकारी कर्मचारी,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीतील सर्व सहकाऱ्यांनी,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांत कार्यरत असलेल्या सर्व बीएड कॉलेजच्या प्राचार्यानी तथा प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वलिखित “अभंग तरंग” व “निखारा ” हे काव्यसंग्रह भेट देऊन डॉ.गजानन गुल्हाने सरांचा सत्कार व गुणगौरव केला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी माजी कुलगुरु मा.श्री वसंतराव जामोदे सर डॉ.एम.एल.नानकर सर,जळगाव विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. साहेबराव भूकन सर,सत्कारमूर्तींचे थोरले बंधू श्री नरेंद्र गुल्हाने,अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कारमूर्ती डॉ.गजानन गुल्हाने यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की ,” मी जे काही केलं ते विद्यार्थ्यांना व समाजाला देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये विविध संशोधन कार्य करीत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना दैवत समजून मार्गदर्शन केले त्यांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केते. विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सतकार्याची भूमिका घेतली.सेवानिवृत्तीनंतर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. गजानन शर्मा, सूत्रसंचालन डॉ.कुकडपवार मॅडम यांनी केले तर आभार डॉ.दीपक जयस्वाल यांनी मानले. सत्कार सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉ . गजानन गुल्हाने सर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले पंचवीस शिक्षण आचार्य पदवीधारक विद्यार्थी व पदव्युत्तर शिक्षण विभागातील सहकारी सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.