मी आणि माझ्या आठवणी…!
खर तर आठवण म्हणजे आयुष्यातील खूप मोठी साठवण असते. कारण आपला मेंदू जोवर कार्यशील आहे ना तोवर त्या आठवणी ते क्षण डोळ्या समोर अगदी कितीही वर्षे झाले ना तरी ही उभ्या करतात बर ह्याला ना कुठलं सॉफ्टवेअर लागत ना कुठलं अप्लिकेशन.आठवण आली की मग त्या आठवणी सोबत आठवणींची रांग सुरू होते. कटू ” गोड” आठवणींचा खजाना मनाला कधी दुःख तर कधी काळजाला सुखावून जात असतो.
मोबाईल चाळत असताना हा फोटो दिसला ह्यात असणारा हितेश रावळ आणि मी वर्ग मित्र अहमदनगर मध्ये आम्ही दादाचौधरी विद्यालयाचे विद्यार्थी.1996 ला आम्ही दहावी उत्तीर्ण होऊन.वेगवेगळ्या ठिकाणी जरी गेलो असलो तरी आज ही आम्ही एकमेकांशी जोडलेलो आहोत, ह्याचा खूप मोठा आनंद आहे.खर आयुष्याचा प्रवास सुरु होऊन आता नाही म्हटलं तरी काही अंशी आणि ज्या प्रमाणे तणाव , व्यस्तता वाढली व अपघात वाढत चाललेले आहेत त्याच बरोबर आजार ही त्यामुळे अचानक अनेक जण निरोप घेताना आपण पाहतो. तसच काही आमच्या मित्रांनी ही निरोप घेतला आहे.
त्यामुळे शेवटचा श्वास” शेवटचा दिवस; आणि शेवटचं वर्ष” कोणतं असेल हे कुणीच सांगू शकत नाही.जो वर बालपणीचे मित्र तुमच्याशी जोडलेले आहेत तोवर खरोखर तुम्ही जीवनातील सर्वात मोठा घटक सोबत घेऊन जगत आहात. मित्र” हे आयुष्याला समृद्ध करणार पात्र; तर आहेच,परंतु आपली डाऊन होणारी बॅटरी जर कोण फास्ट चार्ज करत असेल तर ते असतात मित्र. काय माहीत नसतं त्यांना आपलं?
सगळा इतिहास तोंड पाठ असतो.त्यांच्या तोंडून तो ऐकताना होणारा आनंद अविस्मरणीय असतो नाही का ? आनंद शोधायला निघालेल्या प्रत्येक व्यक्तींनी जर आपल्या बालपणीचे मित्र शोधले आणि त्यांच्या सोबत कधी तरी आठवड्यातुन एकदा जरी बोलत राहिले ना, तरी ही पहा..तुंमंच जगणं देखण होऊन जाईल
इतकी ताकत मैत्रीत आहे.
मग कधी बोलताय कधी शोधताय तुंमचे मित्र..!
– अशोक पवार
गटेवाडी अहमदनगर