मारियताे दंभ। पत्रकार ।।
Contents
hide
लेखणीचे शस्त्र।शब्दांचिया धार।
डाेईवर भार।समाजाचा।।१।।
आचार,विचार।घेतलास वसा।
पुसलाच ठसा।अज्ञानाचा।।२।।
संस्कृती,साहित्य।माहितीचे लेख।
मत तुझे पाक।मांडियताे।।३।।
विविध समस्या।जातिपाती,धर्म।
कुटील ते कर्म।बातमीत।।४।।
प्रकृत्ती,विकृती।सत्याचाच संग।
मनुजाचे व्यंग।रेखाटिताे।।५।।
राष्ट्र,परराष्ट्र।मुख्य ताे मथळा।
फाडिताे काेथळा।आव्हानांचा।।६।।
निसर्ग,विसर्ग।हात,घातपात।
संकटी या मात।सदाचीच।।७।।
कला,क्रीडा स्थान।लक्ष्य ते विशाल।
क्रांतीची मशाल।पेटविताे।।८।।
कुशल काैशल्य।अक्षरांचा खेळ।
भावनांचा मेळ।अंतरीचा।।९।।
संस्कार,शिक्षण।वृत्तचि आरसा।
चालविताे वारसा।जागृतीचा ।।१०।।
इंद्रजित म्हणे।लाेकशाही स्तंभ।
मारियताे दंभ।पत्रकार ।।११।।
– इंद्रजित पाटील
माे.नं.- ८००७७८९६१०
(कवितासंग्रह – चिबाड)
🌹🙏🌹