* महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा ‘ सत्यशोधक ‘ हा मराठी चित्रपट करमुक (Tax Free) व्हावा.
* विविध संघटनेद्वारे मा.जिल्हाधिकारी साहेबांना दिले निवेदन
अमरावती (प्रतिनिधी) : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडे भाड्यात दि.१ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.त्यांनी सर्व जाती – धर्म -पंथातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या उद्धारासाठी सर्वकष लढा दिला. त्यांचा संघर्ष हा सकल मानव जातीच्या प्रतिष्ठेसाठी होता, मानवतेसाठी होता. त्यांच्या क्रांतिकारी सत्यशोधक चळवळीवर प्रकाश टाकणारा ” सत्यशोधक ” हा चित्रपट दि.५ जानेवारी २०२४ रोजी प्रसारित होत आहे.
महाराष्ट्राला फुले -शाहू – आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. “सत्यशोधक” चित्रपटातील त्यांच्या क्रांतिकारी चळवळीचा इतिहास हा संपूर्ण जनतेला प्रेरणा देणारा आहे .तेव्हा ” सत्यशोधक ” हा चित्रपट सर्व स्तरातील लोकांना बघता यावा यासाठी तो करमुक्त ( Tax Free ) व्हावा आणि महाराष्ट्रातील फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीतील करोडो समता सैनिकांची मागणी पूर्ण करावी असे निवेदन दि.२ जानेवारी २०२४ ला सन्मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांना सन्मा.आमदार श्री बळवंतराव वानखडे (दर्यापूर मतदारसंघ ),उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड, सर्व शाखीय माळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. गणेश खारकर, कार्याध्यक्ष श्रीकृष्णदास माहोरे,कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले तसेच ओमप्रकाश अंबाडकर,इंजि. सुभाष गोहत्रे,इंजि.भारतराव खासबागे ,युवा उद्योजक नंदकिशोर वाठ , प्रा.एन.आर. होले, रामकुमार खैरे, प्रकाश खंडारे, इंजि.ज्ञानेश्वर कुर्वे, रामकुमार खैरे,मधुकर आखरे,वसंतराव फडके,डी.एस. यावतकर,माळी वैभवचे अनिल भगत, प्रदीप लांडे, मा. कारागृह अधिक्षक कमलाकर घोंगडे, श्री अतुल नाचणकर,गोविंदराव फसाटे, स्मिता संजय घाटोळ, प्रा. डॉ. उज्ज्वला सुरेशराव मेहरे, सौ.जयश्री प्रकाश कुबडे, श्रीमती जयश्री ठाकूर,हरीश सावरकर, सुरेशराव मेहरे, नयन मोंढे, अभिजित कळमकर यांनी निवेदन दिले.