गुरुकुंजात माघ शुध्द दशमी भव्य महोत्सवाला 12 फ्रेब्रुवारीपासुन सुरुवात
गुरुकुंज मोझरी (वार्ताहर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण हरी मंदिरात माघ शुध्द दशमी महोत्सवाचा 63 वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.
दि.12 फेब्रुवारी पासुन 19 फेब्रुवारी पर्यंत आयोजित या भव्य महोत्सवात विविध धर्मिक,सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रम साजरे होणार आहे. दि.12 रोजी पहाटे 4.30 वाजता तिर्थस्थापनाने महोत्सवाला सुरुवात होईल दररोज पहाटे सामुदायिक ध्यान, सकाळी 8 ते 9 पर्यंत सामुहीक ग्रामगीता वाचन,सामुदायीक प्रार्थना, सकाळी 9.30 ते दु.12 पर्यंत ग्रंथराज ग्रामगीता ज्ञानामृत प्रवचन,सायंकाळी प्रार्थनापर चिंतन,दररोज महाप्रसाद,दि.18 रोजी महीला राज्यस्तरीय संमेलन होणार असुन या कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणुन भाजपाच्या जेष्ठनेत्या व अमरावती लोकसभा मतदारसंघ प्रभारी निवेदिता चौधरी,कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे राहणार आहे.महीलांचे सामाजिक योगदान काल आज व उद्या या विषयांवर वक्ते आपले विचार व्यक्त करतील.दि.19 रोजी समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपासुन रामकृष्ण हरी मंदीरापर्यंत भव्य ग्रामगीता शोभायात्रा निघणार आहे. माघ शुध्द दशमी महोत्सवाला मोठयासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रामकृष्ण हरि मानवता मंदिर समितीचे विश्वस्त प्रमुख राष्ट्रीय किर्तनकार विलासराव साबळे यांनी केले आहे.