मोर्शी वरूड तालुक्यात अवकाळी पावसामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान !
Contents
hide
* अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून तत्काळ मदत वाटप करा !
* आमदार देवेंद्र भुयार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी !
गौरव प्रकाशन मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : मोर्शी वरूड तालुक्यांमध्ये २७ ते २९ नोव्हेंबर, २०२३ अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे पिकांचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन तात्काळ अनुदान वाटप करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मोर्शी वरूड तालुका विक्रमी संत्रा विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्राचा आंबिया बहर घेणाऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारा अवकाळी पाऊस ठरला आहे. त्यासोबतच बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
मोर्शी वरूड तालुक्यात आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सध्या आपल्या बागा ताणावर सोडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबिया बहर फोडणाऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे. पावसामुळे आंबियाच्या नव्या फुटींवर परिणाम होऊन कोट्यावधी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बागेचे पाणी बंद केले जाते. त्यानंतर १० ते १५ जानेवारीपासून बागेला पाणी दिले जाते. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फूलधारणा होण्यास सुरुवात होते. पावसामुळे हे सारे व्यवस्थापन प्रभावित झाल्याने आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
मोर्शी वरुड तालुक्यातील या भागात दिनांक २७ ते २९ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीमध्ये अवकाळी वादळी पाऊस झालेला आहे. सदर झालेल्या वादळी पावसामुळे शेतक-यांचे गहू, हरबरा, तुर, संत्रा व मोसंबी इत्यादी शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. व त्यामुळे शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत आलेला आहे.
करीता सदर गहू, हरवरा, तुर, संत्रा व मोसंबी इत्यादी शेती पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतक-यांना तातडीने मदत करण्यासाठी झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीचा शासनाकडे तात्काळ अहवाल सादर करण्यावावत संबंधितांना निर्देश देवुन नुकसान ग्रस्त शेतक-यांना तातडीने अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.