पतंग- खेळ की मौत.?
बाजारचा दिवस आणि फक्त त्याच दिवशी मुलांना खाऊ हे जवळपास खूप वर्ष समीकरण होते , त्या खाऊची उत्सुकता इतकी असायची की वडील सायकलवरून बाजार आणताना दिसले रे दिसले की पळतच सुटायचं, निदान आपल्या पिढीत तरी हेच होते.
खाऊ खाऊन झाल्यावर त्याला गुंडाळलेला दोरा घ्यायचा आणि तो एका काडकीला गुंडाळून ठेवायचा आणि तो खाऊचा पेपर सरळ करून त्याला घोळाचा ( खराट्याचा) दोन काडक्या लावून त्याची पतंग बनवायची व दोऱ्याने मंगळसूत्र बनवून त्याला तो खाऊचा दोरा बांधायचा , साधारण 50 फूट साधा दोरा असायचा आणि पतंग हा खेळ खेळायचा व बालपणीचा खेळाचा आनंद घ्यायचा.
तेव्हा पतंग हा फक्त एक मनोरंजनासाठी खेळ होता, आता त्याच पतंग खेळाचे स्वरूप बदलत गेले , दोऱ्याची जागा मांजानी घेतली , काडकी ची जागा असारी ( फिरकी ) ने घेतली तोंडाने जे गाणं गुंणगूनायचे त्याची जागा डीजे ने घेतली , बघता बघता पतंग खेळाचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले , पतंग आता उंच उंच आकाशात झेप घेऊ लागले , खूपच उंच जिथे नजरही कमी पडते, आणि मग पतंगाची खेळ सोडून काटाकाटी सुरू झाली , काटलेली पतंग गोळा करणे , काटलेला मांजा गोळा करणे हा लहान मुलांचा नवीन खेळ सुरू झाला.
यातच लहान मूल इतकी सैरा वैरा पळतात की त्यांना कशाचेच भान राहत नाही, फक्त आणि फक्त किती पतंग गोळा केल्या आणि किती मांजा मिळाला यातच ते धन्य मानू लागले तोच त्यांचा जीवनाचा आनंद बनू लागला.
पण हाच आनंद क्रित्येक मुलांचा आयुष्यावर बितु लागला ,कितीतरी बातम्या नेहमीच कानावर येऊ लागल्या पतंग खेळताना विजेला चिटकला, पतंगाचा मांजाने गळा कापला, पतंग उडवताना इमारती वरून कोसळला, मांजाला अडकून पक्षी मेले अशा असंख्य घटना घडतात.
पतंग खेळताना विहिरीत पडून लहान मुलाचा मृत्यू , अस जेव्हा डोळ्याने प्रत्यक्ष बघतो तेव्हा डोळ्यांनाही बघवत नाही तेही आपोआप बंद होतात, अस निरागस बालकाच ऐकून काळजाचा थरकाप उडतो अजून काहीच जग न बघितलेल्या मुलाचा असा अंत होतो , मन खिन्न खिन्न होऊन जाते, मग मनात अनेक प्रश्न निर्माण होतात याला जबाबदार कोण ?
पतंग हा खरच खेळ आहे की मौत ?
पतंग हा खेळच होता पण कालांतराने त्यात बदल होऊन त्या खेळाचे रूपांतर भलतेच होऊन बसले आणि त्यात निष्पाप मुलांचे बळी जाऊ लागले, मग पंतग बनला मौत!
याला जबाबदार न तुटणारा मांजा बनविणारे ? की अजून दुसरे कोणी ? की मुलांना गरज नसताना मांजा, असारी विकत घेऊन देणारे पालक? नक्की कोण?
प्रश्न अनेक पडतात पण अस घडू नये म्हणून काय करायला पाहिजे हा विचार करण्याची वेळ आता आली आहे , जेव्हा 9 महिने पोटात वाढविलेले मूल जात त्या मातेलाच समजत ते दुःख काय असत ते.
पतंग हा खेळ पूर्वीसारखाच साध्या दोऱ्याने थोडासाच उंच आणि मोकळ्या मैदानात खेळावा, मांजा पूर्णतः बंद करावा ,
कुठल्याही इमारतीवर तसेच घरावर पतंग खेळण्यास बंदी घालावी,
अस जर केले तर आणि तरच पतंग हा एक खेळ राहील नाहीतर पतंग हा खेळ मौत का खेळ बनेल !
– वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर.
(दोडी बू.)
(७०२०३०३७३८)