भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील शब्द न शब्द हे अन्यायग्रस्तांन साठी अमृत ठेवा

भिमजयंती निमित्याने
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील शब्द न शब्द हे अन्यायग्रस्तांन साठी ” अमृत ठेवा – यशस्वी व उज्जवल मार्गासाठी “
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १४ एप्रिल १८९१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट करून ज्ञानसाधना करून अनेक विषयात ज्ञानशांखावर त्यांनी प्रभुत्व संपादन केले याद्वारे त्यांनी स्वतःची शैक्षणिक उन्नती तर साधलीच सोबतच समग्र भारतीयांच्या जीवनात महान क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट केले.
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे  शोषितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत शिक्षणाच्या बळावर एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे काम महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केले असून एक प्रकारे भारताची पायाभरणी केली आहे.अन्यायग्रस्त समाजासाठी त्यांनी मोलाचे अतुलनीय कार्य केले  अशा लोकांसाठी त्यांनी त्यांच्यामध्ये चेतना,जागृती निर्माण करण्यासाठी विपुल लिखाण केले “त्यांचे लेखणीतून देशभरातील सर्वांनाच न्याय मिळाला.” सर्वच जातीपातीच्या विकासाचा विचार   करता सर्वांसाठी मानव कल्याणासाठी त्यांनी कार्य केले.  स्रियांच्या सन्मानासाठी केलेल्या कार्यात बाबासाहेबांचा  सिंहाचा वाटा आहे.
प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करायलाच पाहिजे. “वाचाल तर वाचाल,”  असा संदेश बाबासाहेबांनी दिल्यामुळे आज अन्यायग्रत्तांना गुलामगिरीच्या बेड्या तोडून ताठ मानेने जगायला भारतरत्न बाबासाहेबांनी शिकविले. अन्यायग्रस्ताच्या वाट्याला आलेले दुःखे बाबासाहेबांनी  स्वतः अनुभवली होती त्यामुळेच ते आपल्या बांधवांना आत्मविकासाचा योग्य मार्ग दाखवू शकले.
जुन्याकाळी समाज अज्ञान, निरक्षरत: अनिष्ट रूढी परंपरा,अंद्रश्रद्धा, गरिबी अशा व्याधींनी समाज पोखरलेला होता, दुःखी होता.  अन्याय, छळ, अपमान ,अशा जगण्याने समाजाचे रोजचे जीवन  दुःखमय झाले होते. अशा समाज बांधवांची दुःखे डॉक्टर बाबासाहेबांनी पाहिले आणि स्वतःही अनुभवली होती.
माझ्या  बांधवांचें  दुःख मी दूर करीन या हेतूने अनेक कार्य त्यांनी केले मानवतेच्या अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी  अपार कष्ट करून मिळवून दिला.समाजउन्नतीसाठी त्यांच्या मध्ये चेतना, ऊर्जा निर्माण व्हावी या साठी अनेक महान ग्रंथ भारतरत्न बाबासाहेबांनी  लिहून समाजासाठी उपलब्ध करून दिले ते वाचल्या नंतर मानवाला यशस्वी मार्ग दिसतो ऊर्जा निर्माण होते. स्वतंत्र भारता साठी राज्यघटना लिहून भारतात लोकशाही राज्यव्यवस्थेचा मजबूत पाया घातला म्हणून आज भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र ठरले भारतरत्न बाबासाहेबांच्या कार्यामुळे भारत देश प्रशेंसेस पात्र ठरला.
राज्य घटनेमुळे  दिलेल्या अधिकारातून आज गरीबातील गरीब पुरुष,महिला महत्वाचे पदावर देश विकासाचे कार्य  करतांना दिसत आहे. बाबासाहेबांनी दाखविलेल्या अधिकाराने प्रत्येक मानवाला त्यांचे अधिकाराची जान झाल्याने शासकीय यंत्रणेशी लोकशाहीच्या मार्गाने झुंज देऊन न्याय मिळवून घेत आहे.  *”अश्या माझ्या भीमाची पुण्याई वर्णावी किती”* किती तरी लिहिले तरी कमीच पडेल अशा  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची किमया आहे. जयंती निमिताने   “तु फुकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर”
“तु तोडल्यास गुलामगिरीच्या पायातल्या बेडया त्या फक्त आणि फक्त ज्ञानाच्या बळावर “ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी. जयंती जगभरात आज रोजी साजरी होत आहे या  जयंतीच्या निमित्ताने भारतीय नागरिकांना भीम जयंतीच्या उमेश म. ढोणे यांजकडून  लाख लाख शुभेच्छा देतो.
-उमेश महादेवराव ढोणे
महासचिव -३३अन्याय्यग्रस्त जमातीचे व्यासपीठ. महाराष्ट्र राज्य कृती समिती.
मोबाईल नंबर-९०४९०६७३३१
Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram

Leave a comment