साहित्यीक, शेतकरी आंदोलक विजय ढाले यांच्या पत्राची कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने घेतली दखल
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र ही संताची भुमी आहे. या भूमिला साहित्य संस्कृती आणि कलेचा वारसा लाभलेला आहे. परंतू या गुगल ग्लोबल युगात आपण आपली परंपरा संस्कृती विसरत चाललोय, एके काळी प्रत्येक गाव खेड्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रम व्हायचे जसे की किर्तन, दंडार, नाट्य, काव्य संमेलने,साहित्य संमेलने परंतू आता हे होतांना दिसत नाही या कारणाने अशी भिती निर्माण झाली आहे की, येणारी पिढी ही संस्कृती आणि संस्कारापासून दुर तर नाही जाणार व इथे या पुढे कलाकार साहित्यीक निर्माण होनार तर नाही ना, मनोरंजनापासून समाज वंचित तर राहणार नाही.
कलेचे व कलाकारांचे संस्कृतीचे भवितव्य अंधारमय दिसत असतांना आर्णी येथील लेखक साहित्यीक कवी शेतकरी आंदोलक विजय ढाले यांनी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अमरावती महाराष्ट्र राज्य यांना पत्र प्रपंचाद्वारे जाणिव करून दिली त्यांची ही विनंती कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री. निलेश हेलोंडे यांनी तात्काळ दखल घेत अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या सर्व जिल्हा परिषदांना समाज प्रबोधन व्हावं व गावोगावी, खेडोपाडी सामाजिक बांधीलकी म्हणून साहित्य संमेलन व्हावी, नाटके व्हावी,काव्य संमेलने सांस्कृतीक कार्यक्रम व्हावे या साठी तात्काळ कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाही बद्दल कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महा.राज्य या कार्यालयास कळवावे, असे नमुद केले आहे.