पत्रकार दिन
बाळशास्त्रीजींचा । आज जन्मदिन ॥
करांनी वंदन । कोटी कोटी ॥ १ ॥
दर्पणकारांचे । जनप्रबोधन ॥
दर्पण अर्पण । समाजाला ॥ २ ॥
बाळशास्त्रीजींनी । घडविले जन ॥
करूनी लेखन । दर्पणात ॥ ३ ॥
जांभेकर एक । जनप्रबोधक ॥
घडले वाचक । वाचनाने ॥ ४ ॥
पत्रकार दिनी । हार्दिक शुभेच्छा ॥
मनस्वी सदिच्छा । सर्वांनाच ॥ ५ ॥
पत्रकारांचा हा । सन्मानाचा दिन ॥
झटे रात्रंदिन । जनांसाठी ॥ ६ ॥
पत्रकारांची या । झुंजार लेखणी ॥
निर्भीड लेखणी । असावीच ॥ ७ ॥
पत्रकारिता ही । मूल्य जोपासते ॥
जन जागविते । लेखणीने ॥ ८ ॥
अग्रलेखातून । निर्भिड लेखन ॥
जागृत हे मन । वाचकांचे ॥ ९ ॥
विचार शब्दांचा । असावा सुगंध ॥
चोहिकडे गंध । लेखणीचा ॥ १० ॥
पत्रकार बंधू । करितो लेखन ॥
जागृत हे जन । करितसे ॥ ११॥
चौथा स्तंभ आहे । लोकशाहीचा हा ॥
पत्रकारिता हा ॥ जगतात ॥ १२ ॥ .
समाजाभिमुख । निर्भिड लेखन ॥
घडे जनमन । दररोज ॥ १३ ॥
पत्रकार दिनी । करितो सलाम ॥
करांनी प्रणाम । मनोभावे ॥ १४ ॥
– प्रा . अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर ,अमरावती .
भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९