संविधानाच्या मुल्यांचे पालन करणे गरजेचे-आमदार देवेंद्र भुयार
* वरूड येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जागर संविधानाचा कार्यक्रम
* संविधान दिनानिमित्त आनंद शिंदे यांनी केले प्रबोधन !
गौरव प्रकाशन वरूड (तालुका प्रतिनिधी) : संविधानाचा विचार तळागळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळाच्या वतीने विविध प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संविधानाच्या मूल्यांचे सर्व नागरिकांनी पालन करावे असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. संविधान दिनानिमित्त रविवारी (ता.२६) रोजी नगर परिषद परिसरामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांना शुभेच्छा दिल्या. आमदार देवेंद्र भुयार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळातर्फे आयोजित संविधान दिनाच्या निमित्ताने जागर संविधानाचा प्रबोधनपर संगितमय कार्यक्रमाचे आकर्षण ठरलेले आनंद शिंदे हे एक मराठी गायक असून त्यांनी हजाराहून अधिक गाणी आणि २५० चित्रपटांत पार्श्वगायन केलेलं आनंद शिंदे भीमगीते व लोक गीतांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. या शिंदे कुटुंबाच्या पाच पिढ्या गायन क्षेत्रात असून लोकगीत गायन करणारे हे महाराष्ट्रातील एक कुटुंब असून आनंद शिंदे यांच्या बहारदार
लोकसंगीताच्या कार्यक्रमाने वरूड मोर्शी तालुक्यातील हजारो नागरिकांची मने जिंकली.
“आमचा प्रत्येकाचा धर्म आहे आणि धर्मग्रंथही आहे. परंतु भारताचा नागरिक म्हणून आपला एकच राष्ट्रग्रंथ आहे. आणि तो म्हणजे भारताचे संविधान आणि या संविधानाने प्रत्येक नागरिकाला जीवंत राहण्याचा हक मूलभूत हक म्हणून प्रदान केला आहे.” “प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांप्रती आपले कर्तव्य आणि उत्तरदायित्व समजून घेणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी समाजात सामाजिक सद्भाव असावा याकरिता सर्वांनी प्रयास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.
जागर संविधानाचा कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे (मुंबई आणि संच), आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह मोर्शी वरूड तालुक्यातील हजारो नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. जागर संविधानाचा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जागर सविधनाचा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागसेन बुध्द विहार वरुड, करुणा बुध्द विहार वरुड, सम्यक बुध्द विहार वरुड, प्रज्ञासूर्य महीला मंडळ वरुड, भारतीय बौद्ध महासभा वरुड, बिरसा क्रांती दल वरुड, समाज प्रबोधन मंच वरुड, मराठा सेवा संघ वरुड, जिजाऊ ब्रिगेड वरुड, संभाजी ब्रिगेड वरुड, सत्यशोधक फांऊंडेशन वरुड, वरुड युवा व्यापारी संघटना वरुड, अकॉर्ड फांऊंडेशन वरुड, आलमगीर एज्युकेशन सोसायटी वरुड, समता पर्व वरुड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरुड तालुका, श्रध्दा शिक्षण केंद्र वरुड, वस्ताद लहुजी बहुउद्देशीय संस्था, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, वरुड, आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळातर्फे अथक परिश्रम घेण्यात आले.