होळीचं सोंग घेवून..!
होळी हा सण भारतभर आगदी उत्साहने साजारा होणारा सण आहे.हा भारतीय संस्कृतीचा सण आहे.संस्कृती जपण्याचं हा उत्सव आहे.जातीभेद,मनभेद विसरून जाण्याचा व आनंद उधळण्याचा हा सण आहे.उत्तर भारतात हा सण मोठया उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.महाराष्ट्रातही हा सण अतिशय आनंदाने मनभेद,मतभेद विसरून साजरा केला जातो.
महाराष्ट्रातील बंजारा समाज तर होळी सण साजरा करत तांडा संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतो.आज होळीचे कितीही आपण गुणगान केलो तरी चाळीस पन्नास वर्षापूर्वी होळी साजरी करताना जो जोम होता,उत्साह होता,आनंद होता,आपुलकी,प्रेम होतं ते आज दिसून येत नाही.रंगाचं सण असुन पूर्वीपेक्षा थोडसं रंगहीन झाल्याचं जाणवतं.चाळीस पन्नास वर्षापूर्वी तांडयावरची होळी जवळपास तब्बल एक महिना आगोदरपासुन साजरी केली जायची. लाकडाच्या टिपऱ्या तयार केल्या जायच्या.काही वयस्क मंडळी बसूनच लेंगी गायाचे.नाचता नाचता बसायचे बसता बसता उठायचे.ढाल्याच्या डफाच्या तालावर सर्व बेभान व्हायचे.
एक महिणा आगोदर नाचगाणे सुरु व्हायचे.तांड्यातील आबाल वृद्ध,स्त्री,पुरुष हे सर्व बेभानपणे मध्यरात्र होईपर्यंत नाचत राहायचे. जीवनातलं सर्व दुःखं विसरून बंजारा स्त्री पुरुष, तरुण पोरं पोरी फेर धरून गाणे यांने लेंगी गीत गावून जीवनातील आनंद साजरा करावयाचे.यामुळे लेंगी गीत एका पिढीकडून पुढील पिढीकडे हस्तांतरीत व्हायचे.होळी गीत अर्थात लेंगी म्हणताना स्त्रीचा गट वेगळा, पुरुषाचा गट वेगळा.आगदी वयस्कर झालेली माणसं काठी टेकत टेकत होळी खेळणाऱ्याजवळ जावून बसायचे.त्यांच्या काळातील लेंगीगीत गायाचे.
● हे वाचा – मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा
चाळीस पन्नास वर्षापूर्वी तांडयावरची होळी जवळपास तब्बल एक महिना आगोदरपासुन साजरा करावयाचे, नाचगाणे सुरु व्हायचे. तांड्यातील आबाल वृद्ध,स्त्री,पुरुष हे सर्व बेभानपणे मध्यरात्र होईपर्यंत नाचत राहायचे.फेर धरून गाणे यांने लेंगी गीत गावून जीवनातील आनंद साजरा करावयाचे.यामुळे लेंगी गीत एका पिढीकडून पुढील पिढीकडे हस्तांतरीत व्हायचे.होळी गीत अर्थात लेगी म्हाताना स्त्रीचा गट वेगळा पुरुषाचा गट वेगळा.आगदी वयस्कर झालेली माणसं काठी टेकत टेकत होळी खेळणाऱ्याजवळ जावून बसायचे.त्यांच्या काळातील लेंगीगीत गायाचे.
लेंगी गीत गाताणा सुरवातीस बंजारा समाजातील साधू संत थोर व्यक्तिविषयी गुणगान करणाऱ्या लेंगी गायिल्या जातात.मग समाजातील गुणदोषांचं वर्णन असलेल्या,समाजहिताच्या लेंगी गायिल्या जातात.लेंगी समाज प्रबोधनाच एक उत्तम साधन आहे.त्यानंतर मनोरंजनात्मक त्याचबरोबर नातेसंबंध जपणाऱ्या लेंगी दिलखुलासपणे गायिल्या जातात.यात नातेसंबंध जपताना ननंद भावजय,दिर भावजय.दाजी मेव्हना ,दाजी मेव्हनी हे लोक लेंगी गितातून एकमेकांची टर उडवतात.एकमेकांला चिडवतात. लेंगी गीताचे तोंडातून निघालेले शब्द समोरच्या कमरेपर्यंत पोहचतात. कमरेचा खाली जात नाहीत. एक विशिष्ट मर्यादा पाळली जाते.मर्यादेचं उल्लंघन कोणी ही करत नाही.होळीची लेंगी गाताना.मनातील सप्तरंगाची उधळण करताना करताना मनात कुठेच आडपडदा नसते.
मला वाटते फार पूर्वी बंजारा समाज हा मातृसत्ताक गण असावा.लेंगी गितातून आगदी मुक्तपणे वागणे हे याचेच द्योतक असावे. दुसरी गोष्ट आशी ही असू शकते की जेव्हा आजचे नातेसंबंधच निर्माण झाले नसेल तेव्हापासून ही पद्धत चालू झालेली असावी.इतर समाजातील स्त्रीयांपेक्षा बंजारा समाजातील स्त्रीया किमान कुटूम्बात मुक्तपणे संचार करतात.घरातील यांने कुटूंबातील महत्त्वाच्या निर्णयात विशेष करून वयस्क स्त्रीया महत्वाची भूमिका बजावताना दिसतात.म्हणुन मला वाटते सप्तरंगाच्या मानवी मनाची उधळण हे पुरातन काळापासून चालत आलेली आसावी.
प्रत्येक समाजात कोणातीही सण असो तो धुमधड्याक्या साजरी करण्याची एक टुम निघाली आहे.पण हा सण का साजरा केला जातो याचे कारण त्यामागील उदेश त्या सणाचा इतिहास हा समाजातील बहुसंख्य घटकांना माहित नसते.कोणताही सण का साजरा करतात ? असं जर विचारलो तर सर्रास उत्तर मिळेल आजोबा,पंजोबा,आई बाबा , शेजारीपाजारी,सगेसोयरे करतात म्हणून आपण साजरा करतो.
होळी का साजरी करतात ?
१ ) होळी साजरी का करतात या पाठीमागे सनातन धर्मात एक कथा आहे.थोडक्यात ती कथा अशी अहे.हिरण्यकपश्यू नावाचा एक राजा होता.तो असुरांचा राजा होता.कथेनुसार तो देवधर्म पाळत नव्हता.विष्णुला मानत नव्हता.तो त्यांची पूजाआर्चा करत नव्हता.राज्यातही कोणालाही विष्णुची पुजा करु देत नव्हता.पण त्याच्याच पोटी जन्मलेला त्यांचा मुलगा प्रल्हाद हा विष्णुचा परमभक्त होता.त्यासाठी त्याने भक्त प्रल्हादाचे आतोनात छळ केला.
हिरण्यकश्यपूची एक बहिण होती तिचं नाव होलीका.होलीकाला देवाकडून एक वरदान लाभलेलं होतं.ते वरदान असं होतं ” जोपर्यंत होलिका जनकल्याणार्थी काम करेल तोपर्यंत तिला आग्नी जाळू शकणार नाही.” पण हे वरदान तिने भावाच्या भल्यासाठी विसरली. भावाच्या आदेशाने छोटया प्रल्हादाला घेवून ती रचलेल्या लाकडावर जावून बसली. लाकडं पेटवण्यात आली.होलीका ठोssठोss बोंबलत जळून गेली. हा दिवस होता फाल्गुन पौर्णिमाचा.भक्त प्रल्हाद सुखरूप आग्नी बाहेर आला.तेव्हापासून होलीका/होळी/सिमगा सण साजरा करतात.प्रतिकात्मक होळी पेटवून बोंबलतात.
२ ) व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. काही लोकाच्यामते होळी साजरी का करतात ते सांगतात की : श्रीकृष्ण हा विधिव रंगी विधिव ढंगी व्यक्तीमत्वाचे धनी होते.श्रीकृष्ण रंगाने काळेसावळे होते.तर त्यांची सखी राधा ही सुंदर होती.रंगाने गोरीपान होती.श्रीकृष्ण राधाकडे पाहिलं की त्यांना नेहमी वाटायचं राधा किती गोरी गोरीपान आहे.मी तिच्यासमोर कसा दिसत असेन ? माझा रंग तिला आवडत नसेल.माझा काळा रंग घेवून तिच्या समोर कसा जावू.मी तिच्या जवळ किंवा समोर कसा जावू ? गेलो तर मी तिला आवडत आसेल का ? माझ्यावर ती प्रेम करत असेल का ? असे प्रश्न श्रीकृष्णाला सतत सतवत राहायाचे ; पण भगवान श्रीकृष्ण त्याच्या मनातील भावना कोणासमोरही सांगत नसे.एके दिवसी धाडस करून श्रीकृष्ण त्यांच्या मनातील दुःख,वेदना आई यशोदासमोर मांडायचं ठरविले. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमा.श्रीकृष्ण यशोदा मातेला म्हणाला,” माते मी किती काळा आहे. माझी सखी राधा गोरीपान आहे.मी तिला आवडत असेल का ? तिचेही रंग थोडसं बदलता यईल का ? ”यावर यशोदा मैया श्रीकृष्णाच्या हातात गुलाबी रंग देत राधाचं तोंड रंगवायला लावलं.तेव्हापासून होळी व धुलीवंदन साजरा करतात.असं काही लोकाचं म्हणनं आहे.विशेष करून ब्रजची होळी भारतात प्रसिद्ध आहे.
३ ) भारत हा जगातील काही देशापैकी एक अति प्राचीन देश आहे.येथे अनेक रुढी परंपरा आजतागायत टिकून आहेत.काही काळाच्या ओघात लुप्त झाल्या तर काही नविन उदयास आल्या.धार्मिक कारणाशिवाय सण साजरे करण्याचे काही सामाजिक कारणही आसू शकते.प्रत्येक देशात “आहे रे ” आणि “नाही रे “लोकांचा गट,वर्ग असतो.श्रीमंत गरिबात नेहमीसाठी विषमतेची प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. ही विषमतेची दरी वाढतच आहे.म्हणतात ना राजाला वर्षाचे बारा महीने दिवाळी काय अन दसरा काय सारखंच असते.पण गरीबाला एक वेळचं अन्न मिळणे दुरापस्त झालेले आहे.ही गोष्ट ही पुरातन काळापासून आजपर्यंत चालू आहे व राहणार आहे.त्या काळातील बुद्धीवान विचारवंतानी गरीब लोकांना वर्षातून काही दिवस तरी गोडधोड व पौष्टिक खाता यावे म्हणून असे सण साजरा करण्याची पद्धत रूढ केली असावी.परंतू त्याकाळच्या समाजसेवक म्हणा की विचारवंत म्हणा प्रत्येक लोकांनी सण साजरा करावे म्हणून त्या सणाला धार्मिक कारणांची जोड देवून विशिष्ट दिवशी विशिष्ट सण साजरा करून गोडधोड करण्याची पद्धत रूढ झाली असेल, केली असेल.
४ ) : नुकतच हिवाळा संपलेला असतो. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते.थंडीने सुस्तावलेलं शरीर उन्हाच्या संगतीने सैल होणारं असते.शरीराला गर्मीची सवय व्हावी,उन्हाळा येत आहे हे सांगण्यासाठीही कदाचीत होळी साजरी करत असावेत.होळी पेटवत असावेत.वसंत ऋतूचं आगमन होत असते.या ऋतूच्या स्वागतासाठी होळी सण साजरा करत असतील ? पळस फुललेला असतो.लिंब,आंबे मोहरलेले असतात.कोकीळा गाण्याचा सराव करत असते. रबीच हंगाम संपत आलेला असतो.याच काळात हा सण गोठ्या उत्साहाने साजरा होतो.
होळी आणि नातेसंबध राहतील का ? टिकतील का ? रंग कोणावर उडवणार ?कोणाच्या तोंडाला रंग लावणार ?मनाचे सप्तरंग उघडण्यासाठी नाते असावे लागते.मित्र असावे लागतात.मैत्रि व नाते मनातून जपावे लागते ;पण नाते बुडत चाललेले आहेत.अधुनिक जीवन शैलीत नाते टिकून राहतील काय ?
हे सांगताना खरं तर माझंच मन एका वेगळ्याच कल्पनेत रमतोय.तेथे रमताना मनाला वेदना होत आहेत.मला वाटते सध्याची पिढी ही शेवटची पिढी आहे.जेथे काही प्रमाणात का होयीना नातेसंबध टिकून आहेत.होळीचं सोंग घेवून लावू नको लाडीगोडी म्हनणारं नातं शिल्लक राहील का? नातं कसं टिकेल मला सांगा ना.आहो नाते टिकवायचे असलेतर नात्यातील व्यक्ती जन्माला यावे लागतील की नाही.आता तर हम दो हमारे दो आहे.आता जन्माला येणाऱ्या फारच कमी मुलामुलींना भाऊ बहिन सखा भाऊ सखी बहिन चुलत भाऊ चूलत बहिण,काका पुतण्या मामा भच्चा हे नाते समाजत शोधावे लागणार आहेत. कदाचीत शब्दकोषात अर्थ शेधावा लागणार आहे.दादा राहणार ना वहिनी.असेल तर मुलीला एकच दादा व त्यासोबत वहिनी ? काका राहणार ना काकी.मावशी,काका ही राहणार नाही.उशीरा लग्न होत असल्यामुळे आजी आजोबाही भेटणार नाहीत.घरात ना जावू राहणार,ना दिर.सासूसासरेही घरातून लुप्त झालेले असतील.मुलामुलीला आत्या मामाही राहणार नाहीत.आतेभाऊ, मामेभाऊ, मावसभाऊ,मासव बहिण कुठं सापडतील ? मोठे बाबा,मोठी आई कुठून आणणार आहोत.चूकन एखादाच दाजी मेव्हना असेल.मेव्हनी असणारच नाही.मावशी कुठून आणणार ?छान छान गोष्टी सांगणारे वेळप्रसंगी नातवानसाठी घोडा बणनारे आजी आजोबा कुठून अणणार?आपल्या भावाच्या मुलाला खांदयावर घेवून फिरणारा काका कुठून आणणार ?
मग सांगा आता.सप्तरंगाची उधळन कोणावर करणार.आई बाबाचं एकमकांचं तोंड रंगवणार का ?बदलत्या काळानुसार घरा शेजारील समवयस्काकडे पहात रंग खेळण्यासाठी बोलवणार पण तो हात हालवून न बोलताच तोही आपल्याकडे तोंड फिरवून घरात निघून जाणार. होळी निमित्याने नाते संबंध असेपर्यंत टिकवू या. आनंदाने सप्तरंगाची उधळन करू या.
पाण्यातून रंग.रंगातून फुल.फुलातून जीवन फुलवू या. शांततेने व आनंदाने होळी साजरा करू या.
– राठोड मोतीराम रूपसिंग
काळेश्वरनगर,विष्णुपूरी,नांदेड.
९९२२६५२४०७ .