धुळे कारागृहात अ.खा.ची गांधीगिरी; बंदीवानांना सुविचार शिदोरी !
* अभिनव खान्देश व खान्देश पत्रकार संघ वर्धापनदिन
धुळे कारागृहात अ.खा.ची गांधीगिरी; बंदीवानांना सुविचार शिदोरी !
धुळे (प्रतिनिधी) : 11 ऑक्टोबर या अ.खा. आणि खान्देश पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम जयंतीच्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून येथील कारागृहात बंदीवानांसाठी इंटेलेक्च्युअल सोसायटी ऑफ मिडीया प्रमोटर, धुळे युनिट सौजन्याने सुमारे 30 चांगल्या सुविचारांचे बॅनर्सचे प्रकाशन मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता कारागृह अधिक्षक मा.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रारंभी अ.खा.संपादक प्रभाकर सूर्यवंशी व खान्देश पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी पुज्य साने गुरुजींच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. त्यानंतर कारागृह अधिक्षक मा.शिंदे साहेब, उपअधिक्षक बांदल साहेब, तुरुंगाधिकारी सचिन झिंझुर्डे आणि जेल शिक्षक मनोहर भदाणे यांचा खादीचा टॉवेल, गांधी टोपी व गुलाब पुष्प देऊन चांगल्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना अ.खा. संस्थापक संपादकांनी धुळे जेलशी आपला असलेला ऋणानुबंध व्यक्त करतांना म्हटले की, पुज्य साने गुरुजी व विनोबा भावे सारख्या महाविभुतींचा पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळे कारागृह माझी पहिली कर्मभूमी असून येथेच कनिष्ठ लिपीक म्हणून माझा जीवन प्रवास सुरु झाला होता. हे मी माझे भाग्य समजतो. कारण येथील शिस्तप्रिय वातावरण आणि साने गुरुजींच्या विचारांच्या प्रभावामुळेच मी माझे आतापर्यंतचे जीवन प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे आरोग्यदायी जगत आहे.
15 वर्षांच्या पत्रकारितेत विविध उपक्रम राबविले. जेलमधील बंदिवान हे म्हणजे वाट चुकलेले नागरिक असून त्यांनाही विचाराची काही शिदोरी द्यावी अशी संकल्पना नुकत्याच झालेल्या बंदीवानांच्या गणपती मुर्ती प्रदर्शन व विक्री प्रसंगी कारागृह अधिक्षक मा.शिंदे साहेब आणि भदाणे सर यांच्या भेटीमुळे मनाता आली होती. मा.शिंदे साहेबांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे आज हा बॅनर्स प्रकाशनाचा कार्यक्रम होत आहे याचे मला समाधान आहे.
या प्रसंगी खान्देश पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र येवले, महासचिव प्रेमकुमार अहिरे, जेष्ठ सल्लागार गो.पी. दादा लांडगे, जेष्ठ पत्रकार बापू ठाकूर तथा झेप मिडीयाचे संचालक आणि जेष्ठ पत्रकार प्रा.अनिल चव्हाण सहीत कारागृह उपअधिक्षक विशाल बांगर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सचिन झिंझुर्डे, जेल शिक्षक एम.डी.भदाणे सह जेल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना कारागृह अधिक्षक शिंदे साहेब म्हणाले की, धुळे कारागृह ऐतिहासिक असून अभिनव खान्देशच्या या उपक्रमामुळे निश्चितच बंदीवानांना त्यांच्याभावी काळात या सुविचारांची शिदोरी निश्चित मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास आहे. अशा नवनवीन उपक्रमामुळे जीवनात सकारात्मकता येते आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जाते असेही सर्व मान्यवरांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले.