मी भारतीय आहे, डोक्यात ठेव आता… डॉ. अरविंद पाटील (संविधान दिवस काव्यमय मैंफीलीने साजरा )
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) दि.२६नोव्हेंबर २०२३ ला देवळी जि वर्धा येथे स्मृतीशेष नामदेवराव ढोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कवी संमलेनाचे आयोजन करण्यात आले. द्वितीय सत्रात कवी संमलेन संपन्न झाले. कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नंदाताई तायवाडे उपस्थीत होत्या.
सर्व प्रथम गझलकारा सौ. प्रीती राकेश वाडिभस्मे यांनी खालील गझल सादर केली.
अधिकार मानवी अन कर्तव्य ज्ञान आहे
जे तारते जगाला ते संविधान आहे
त्यागून धर्म जाती हातात न्याय, नीती
व्यापक समानतेचे व्यापक विधान आहे
नंदा पांडे आपल्या कवितेत म्हणतात
संविधानाने आम्ही भारताचे लोक झालो
भारत राष्ट्र घडविणे, अंतिम ध्येय न्या रे
हक्काची लढाई लढ्याने, आतातरी एक व्हा रे
संजय ओरके सर यांनी खालील कविता म्हटली..
जिंदगी और मौत
आसान किश्तो के लिये नही है मेरी..!
दिल तो था ही…
अब दिमाग भी अजीब हो गया है ;और परेशान
और आसमा हो गया है..!!
जन्मावेळी मलाच माझी कळ्यण्यापूर्वी
होतोस कशी जात जगाला ज्ञात माणसा
अशी खंत गझलकार प्रकाश बनसोड यांनी व्यक्त केली.
रमाई ही कविता प्रभाकर गंभीर यांनी सादर केली..
साऱ्याच मायमावल्या
दुःखाच्या डागण्या
वाटून घेतात चारचौघीमध्ये
आणि करतात दुःखे हलकी
पुन्हा दुःखाला सामोरे जाण्यासाठी
मानवी मूल्य जोपासणारी
संविधान जपणारी
राष्ट्रासाठी खपणारी
देशासाठी लढणारी
अशी सुंदर अशी कविता प्रकाश जिंदे यांनी सादर केली.
यापेक्षा मी दुसरे काहीही देऊ शकत नाही
किंबहुना
यापलीकडे
निस्ता देखावा करण्याची सुद्धा
माझी लायकी नाही
बाकी मी एवढेच म्हणेन
जग सुंदर आहे…
खूप सुंदर…
कविता बेदरकर मॅडम यांनी तथागत यावरील कविता सादर केली..
आता या निरव तेजाचे बळ घेऊन
मी ही मानवतेचे बीज पेरत आहे
जमिनीचा पोत आणि वाऱ्याच्या वेगाची तमा न ठेवता..
डॉ. अरविंद पाटील सर यांनी सुमधुर आवाजात आपली कविता सादर केली..
ते म्हणतात…
राष्ट्रीय एकता ही, डोक्यात ठेव आता
मी भारतीय आहे डोक्यात ठेव आता
प्रकाश कांबळे, सुरेश भिवगडे, किंजल प्रकाश जिंदे, सुरेश मेश्राम, अशोक मौर्य,प्रशांत ढोले इत्यादी कविनी आपली कविता सादर केली. सर्व कवीचा सत्कार बुके, सम्मानचिन्ह, सम्मानपत्र देऊन करण्यात आला. कवी संमलेनाचे दमदार सूत्र संचालन सुप्रसिद्ध नाटककार, निवेदक विलास थोरात यांनी केले. यावेळी परिसरातील अनेक लोकांची उपस्थिती होती. कविसंमलेन यशस्वी करण्यासाठी प्रवीण ढोले, संध्या प्रवीण ढोले, पद्मा प्रशांत ढोले, मनोज गंभीर, अरुणा मनोज गंभीर, राजेश गंभीर, सविता राजेश गंभीर, कैलास गंभीर, सिंधू ढोले यांनी परिश्रम घेतले.