साहित्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – डॉ. रविंद्र मुन्द्रे
गौरव प्रकाशन हिवरा बु. (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सहाव्या ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी साहित्याचे समाजघडणीतले महत्त्व अधोरेखित केले.
ते म्हणाले, “साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते आणि साहित्यिक हे विकसनशील समाजाचे आधारस्तंभ असतात. साहित्याचे जतन आणि सृजन केल्याशिवाय कोणताही समाज विकसित होऊ शकत नाही.” त्यांनी साहित्याची प्रगल्भता काळानुसार वाढण्याची गरजही व्यक्त केली.
क्रांती आणि साहित्याचा संबंध
इतिहासातील विविध क्रांतींमध्ये साहित्याचा मोलाचा वाटा राहिल्याचे सांगत त्यांनी व्हॉल्टेअर, रुसो, मार्क्स, गॉर्की यांसारख्या लेखकांचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी बौद्ध साहित्य, संत साहित्य, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याच्या क्रांतिकारी भूमिकेवरही प्रकाश टाकला.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
आंबेडकरी साहित्याची दिशा
डॉ. मुन्द्रे यांनी सांगितले की, आंबेडकरी साहित्याचे विषय विज्ञान, संविधान, मानवी हक्क, मूल्य आणि महिलांची प्रगती हे असले पाहिजेत. त्यांनी अलौकिकता आणि अपौरोषेय साहित्याला फाटा देत बुद्धिनिष्ठ आणि मानवतावादी साहित्यनिर्मितीचे आवाहन केले.
उपस्थित मान्यवर
या संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉ. नंदाताई तायवाडे यांनी भूषवले. डॉ. विलास भवरे उद्घाटक होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रकाश चव्हाण, डॉ. सीमा मेश्राम, प्रशांत वंजारे, आणि प्रकाश रामटेके आदी मंचावर उपस्थित होते.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा