होळी
होळी पेटली पेटली
गेल्या उंच ज्वाला
भस्म झाला षडरिपू
आत्मा हा शुध्द जाहला !!
होळी पेटली पेटली
ठोका होळीची रे बोंब
जाळू पळवु दूषप्रवृत्ती
ठेऊ कुविचार लांब !!
अल्ला,लल्ला,बुद्ध, येशू
नको भेद हा मनात
पिता सर्वांचा एकच
घे रे माणसा ध्यानात !!
जात धर्म भेदाभेद
आज होळीत जाळला
मानुसकी हाच धर्म
खरा संतधर्म पाळला !!
सारे मिळुनी खेळुया
आज होळीचा रे सण
चला होळीत जाळूया
भ्रष्ट, दृष्ट असुरजण !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा.पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556