सप्रेम नमस्कार.!
खऱ्या अर्थाने निवडणूक म्हणजे एक सोहळा असतो, हे आता दिसून येऊ लागलं असून लोकसभे पेक्षा ही जास्त हा विधानसभेचा निवडणूक सोहळा रंगतदार होणार अस दिसत आहे.मतदार राजा आणि जनतेच्या हिताचे इतके निर्णय धडाधड होत आहेत,की हे पाहून अस वाटत हेच मुख्यमंत्री”उपमुख्यमंत्री होते की नवीन आलेत. किती धाडसी निर्णय घेत आहेत नाही का ? चीफ तर नाही ना यांच्या मध्ये बसवली धाडसी निर्णय घेण्याची.
तोल जाऊ पर्यंत जनता ओरडून थकली परंतु टोल बंद झाले नाही.परंतु निवडणूक आली असता न मागता मुंबईत जाणारे टोल माफ. आणि नवीन किती तरी महामंडळे स्थापन वाह काय वेग पकडलाय नाही सरकारने .खऱ्या अर्थाने गतिमान सरकार झालंय.
इथून मागेच हे निर्णय घेतले असते तर खूप बरं झालं असत . बाकी मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला ते काम मात्र एक नंबर केलं बर का ह्या सरकारने आता गतिमान निर्णय घेतला असल्या मुळे आमच्या ही वेगवान शुभेच्छा….
पुन्हा येणार की जाणार हे जनता जनार्धन ठरवणार जरी असले तरी रिक्षा वाला देखील ह्या लोकशाही व्यवस्थेत मुख्यमंत्री होऊ शकतो. हे शिंदे साहेबांनी सिद्ध करून दाखवलं संख्या बळ महत्वाचं असत ,निवडणूक झाल्यावर आणि आमदार मंडळी सोबत थेट संवाद ही.
अशोक पवार