सद्भाव यात्रेला पालघर जिल्ह्यातील समस्त समाजाकडून उदंड प्रतिसाद
पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या वनवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि या भागातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यात सद्भाव यात्रा २५ ऑक्टोबर पासून काढण्यात आली आहे. ही यात्रा पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १ नोव्हेंबरपर्यंत प्रवास करत सुरु राहणार आहे.
वनवासी समाजाचा सर्वांगीण विकास हाच या सद्भाव यात्रेचा मुख्य उद्देश्य असल्याचे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले. स्वामी भारतानंद सरस्वती महाराजांनी, ही यात्रा काढण्याचे विविध उद्देश्य आहेत; त्यामध्ये संतांच्या सानिध्यात राहून समाजात समानता निर्माण करणे, विविध जातींमध्ये असणारे वाद मिटवून त्यांच्यात एकी निर्माण करणे, साधू-संतांच्या विचारांच्या माध्यमातून एक चांगले वातावरण निर्माण करणे, सर्व जातिभेद विसरुन सर्वांना एका ठिकाणी आणणे आणि मुख्य उद्देश्य म्हणजे विविध जातींमध्ये वाद निर्माण करुन देश तोडणाऱ्या परकीय शक्तींविरोधात लढा उभारणे हा असल्याचे स्पष्ट केले.
सदर सद्भाव यात्रेला पालघर जिल्ह्यातील समस्त समाजाकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.