* तरुणाईच्या सदैव पाठीशी राहणार : सुनिल देशमुख
* विद्यार्थ्यांच्या विविध समस्या डॉ.यावलेंनी मांडल्या सुनील देशमुखांकडे
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांसाठी सदैव आक्रमक भूमिका घेऊन स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी न्याय देण्यासाठी कार्यरत असलेल्या डॉ. अजय यावलेंनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह बेरोजगार तरुण-तरुणाईच्या विविध समस्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे मांडल्या.
आपण शासन दरबारी अधिक ताकतीने त्या मांडून आम्हाला न्याय देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. खाजगीकरण व कंत्राटी करणाविरोधात संकल्प प्रशासकीय अकादमीचे संचालक डॉ.अजय यावले यांनी सरकारला धारेवर धरत हजारो विद्यार्थ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी तरुण-तरुणाईच्या विविध समस्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे मांडल्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही पाठवण्यात आले. त्यानंतर आता माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.सुनील देशमुख यांची डॉ. अजय यावले यांनी भेट घेतली.
या भेटीदरम्यान त्यांनी खाजगीकरण व कंत्राटीकरणासंदर्भात शासनाने घेतलेले निर्णय, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व तरुण यांच्या मुळावर घाव घालणारे निर्णय शासनाला तातडीने रद्द करावे यासाठी आपण शासन दरबारी अधिक ताकतीने पाठपुरावा करण्याची मागणी डॉ.अजय यावले यांनी डॉ.सुनील देशमुख यांच्याकडे केली. विकास पुरुष असलेल्या डॉ.सुनील देशमुख यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आपण विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी असल्याचे अभिवचन दिले. यावेळी अक्षय धांडे सर, ज्ञानेश्वर मेश्राम सर प्रा.गौतम गवई ,आदित्य यादव , प्रशांत खडसे आदी उपस्थित होते.