गौरव प्रकाशन
वरूड (तालुका प्रतिनिधी) : वरूड येथे आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळातर्फे भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून या आरोग्य शिबिरात विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली.
ईच्छा शक्ती असेल तर एखादा लोकप्रतिनिधी रुग्णसेवा करून शेकडो रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून मदत करून सामान्य माणसांना दिलासा मिळवून देण्यासाठी सामान्य माणसापर्यंत कसा पोहचू शकतो याचे आदर्श उदाहरण ठरत असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे याबाबत नागरिकांकडून त्यांचे आभार मानले जात आहे.
वरूड शहरामध्ये आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवार, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर जिवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबीर घेण्यात आले, उपस्थित डॉक्टर यांच्याकडून शिबिरामध्ये आलेल्या हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली व शिबिरात रुग्णांना सर्वप्रकारच्या औषधींचे मोफत वाटप करण्यात आले. अँब्युलन्ससह सर्व सोयी सुविधा यावेळी येथे सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या आरोग्य महायज्ञ शिबिरामध्ये योग्य नियोजन, डॉक्टरांचे स्वतंत्र कक्ष, रुग्णांना मोफ औषधी वाटप, रुग्णांची यथायोग्य चौकशी करून रुग्ण तपासणी करण्यात आली.
वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार मित्रपरिवार, जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर ,शालिनीताई मेघे हॉस्पिटल वानाडोंगरी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर संपन्न झाले यामध्ये १०५३ रुग्णाची तपासणी करण्यात आली त्यापैकी २५३ रुग्णावर शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
यावेळी या भव्य आरोग्य महायज्ञ शिबिराचे उद्घाटन आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते करण्यात आले असून शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर जिवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये वरूड तालुक्यातील हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
आमदार देवेंद्र भुयार यांनी यापूर्वीसुद्धा अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हजारो रूग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून दिलासा दिला आहे यासह विविध सामाजिक उपक्रम राबऊन, मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडऊन सामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला व शासकीय योजनांचा गरजूंना लाभ मिळवून दिला. कोरोना काळामध्ये मागील काही वर्षांपासून आरोग्य शिबिर घेता आले नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली होती त्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यात विवीध ठिकाणी होत असलेल्या आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरीकांना दिलासा मिळत आहे.