विकृतीकरणाचे पडसाद
बदलापुरच्या घटनेने मन सुन्न झालं? अजाण, अबोध, बालिकेवर असा प्रसंग यावा हे पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना असून, आजपर्यंत त्या गुन्हेगाराला फाशी झाली नाही.?अशा नराधमांना फाशीची सजा ठोठावली असती तर वाईटकृत्ये करणार-यांना चपराक बसली असती!गुन्ह्याची पुर्नरावृत्ती होत नसती. न्यायाची परिणती समाजाला कळल्यावर संविधानाच्या कक्षेत न्याय होतो असे वाटले असते ,परंतू तसे न होता,अत्याचार झाला हे सांगण्यासाठी.. गुन्हेगार ठरवण्यासाठी खुप सारी तयारी करावी लागते .अशावेळी गुन्हेगार पैसामुळे सुटून जातो. आणि दुर-या व्यक्तीला कायद्याची भीती वाटत नाही ,म्हणून
दर एका तासाने भारतात बलात्कार होतो.याला जबाबदार कोण?
१३ऑगस्ट,बदलापूर
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना घडली.शाळेतील चिमुकलीवर अत्याचार झाला ही बातमी वार-यासारखी देशभर पसरली ? लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला?
१५ऑगस्ट, ज्या दिवशी भारत स्वातंत्र झाला ,हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा हर्ष उत्साहाचा दिवस
त्याच दिवशी स्त्रीवर असा अत्याचार होतो म्हणजेच स्वतंत्र भारत कुणासाठी ? स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने मानवी प्रतिष्ठा मिळावी असं म्हटल्या जातं .पण वास्तव मात्र आजही अनेकांच्या तोंडात मनूची जीभ असल्याचे दिसत आहे. बघा फुले ,शाहू,शिवाजीराजे ,आंबेडकर ,यांच्या महाराष्ट्रात महिला ,मुली ,सुरक्षित नाहीत, शाळेत अल्पवयीन मुलीवर कसे अत्याचाराचे प्रयत्न होतात?
२०ऑगस्ट अकोल्याचे प्रकरण
शिक्षकाकडून ६,मुलीचा विनयभंग झाला,असे सांगितले जाते ,ज्यावेळी आपण न्याय मांगतो तेव्हा अन्याय कुणावर होऊ नये, हे पाहणे तेवढेच म्हहत्वाचे आहे.कारण जातीयता मानणे हा सर्वांत मोठा गुन्हा ,!जातीचा अहंकार !मग कधी कधी निर्दोष व्यक्तीलाही गुन्हेगार ठरवते !
२०ऑगस्ट मुंबई
ठाण्यात मतिमंद मुलीवर अत्याचार चांदिवलीमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला ,आज त्या चिमुकलीवर झाला उद्या तुमच्या ही चिमुकली झाला तर ? अशा नराधमांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे,
२०ऑगस्ट लातूर
साडेचार वर्षाच्या मुलीवरह छेडसाड
२१ऑगस्ट नाशिक
साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार ,?
२१ऑगस्ट मुंबई
अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार
खारमध्ये दोन अल्पवयीन मुलीचा शेजार-याकडून विनयभंग?
२१ऑगस्ट पुणे ,
अल्पवयीन तरूणीवर मैत्रीणीच्या मदतीने दोन मित्रांनी केला अत्याचार?
२२ऑगस्ट नागपुर-
आठवर्षीय मुलीवर शेजार-याने केला अत्याचार?
22ऑगस्ट कोल्हापूर-
दाहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केली ,या निष्पाप कळ्या़ंचा काय गुन्हा होता?त्यांनी कोणते अंगप्रदर्शन केले होते? हा प्रश्न भारतवासीयांना त्या चिमुकल्या विचारतात ?तेव्हा भारतातील लोक मुके का आहेत ?,हाच प्रश्न मेलेल्या मनाला पडतो ?जेव्हा माणसाच्या विचारातला न्यायी निर्भिड माणूस जागी होतो !,तेव्हाच अन्यायाचे पडघम दरवाजे भयभीत होतात!
सत्तास्वामी आपले स्वामित्व अबाधित ठेवण्यासाठी आपल्या हिताच्या विषयपत्रिकेलाच संस्कृती म्हणून लोकमान्यता मिळवतात,विराट जनसमूहाच्या अहितावरच या मुठभरांच्या हिताचा वृक्ष बहरत असतो.या असभ्येतेला संस्कृती म्हणता येणार नाही. धर्म,जाती ,ईश्वर, दैववाद अंधश्रद्धा अशा कोणत्याही नावाने शोषण चालत असले तरी या अमानुष्यतेला संस्कृती म्हणता येत नाही , जमावाच्या एकजुटीने समाजमन जिवंत होते,हे जरी खरे असले तरी समाजाच्याच नाकाखाली बलात्कारी निर्दोष सुटतो? ही कुठली संस्कृती आहे ? उदाहरण द्यायचे झाल्यास,
“बिल्बिसबानो वर बलात्कार होतो.तो गैंगरेप असूनही ते आरोपी निर्दोष सुटतात. आणि विचार करणारी गोष्ट म्हणजे महिलांच या गुन्हेगाराची आरती जेलमधून बाहेर आल्यानंतर करतात ते टीव्हीवर चित्रे सगळ्या जगाला दाखवले जातात तेव्हा ,पिडीतांच्या डोळ्यांतील अश्रूंचा थेंब हताशपणे खाली पडतो ,न्यायसंस्थेवर प्रश्नाकिंत नजरेने पाहतो !आता न्याय कुणाकडे मागावा,?संविधान सर्वांना न्याय देते तर मग हा अन्याय का?यांचे सरळ सरळ उत्तर आहे की या सत्तेला संविधान मान्य नाही. त्यांना समानता मान्य नाही .त्यांना लोकशाही मान्य नाही, त्यामुळे अशा आरोपीना कायद्याची भीती वाटत नाही.वैदिकांनी असत्यांनाच सत्यांचे स्वरूप दिले,न्यायाचे आणि शोषणालाच ईश्वरी आज्ञाचे रूप दिले,?समाजातील जमावाची भीती त्याला वाटत नाही. कारण वैदिक संस्कृती ही वेदांमधील चातृर्वणर्या संस्कृती आहे.ती शोषणांची तत्रंविद्या आहे!या विषमत्तेच्या ,अंधश्रद्धेच्या ,
वासनेच्या मुळातूनच असा महाभयंकर क्रिमिनल माईंड ,अतृप्त इच्छा ,लैंगिक कल्पना मोबाईल मधून मिळणारी विकृतीची दृश्य ,हिंसकपणा,राग ,वैर , रक्तरंजितपणाची नशा.दुष्परिणामाणाची लाज लज्जा न वाटणे..हा संहार जागा होतो.मग तो मनुष्य कुणाचा कुणीच नसतो तो फक्त आरोपी म्हणूनच वावरत असतो!यामधून कोल्हापूरच्या सारख्या घटना घडतात , खैरलांजीचे क्रौर्याच्या खुणा ताज्या होतात ,
बलात्कार हा महाभयंकर गुन्हा असतो , तो अपघात होऊ शकत नाही. कारण बलात्कारी अनेक दिवसांपासून तो प्लाँन करत असतो.त्याला त्याच्या गुन्हाची सजा मिळते किंवा नाही हे शेवटी न्यायालयच ठरवणार असते परंतू , या स्त्रीदेहाला न केलेल्या गुन्हाची सजा क्षणाक्षणाला मिळते ?.तिचे जिवनच नष्ट होते?.तिचे आकाशच फाटल्या जाते ?तिच्या मनावर निरतंर भूकंप होत असतात! तिच्या भावनांचा बळी जात असतो ,पंखहिन पाखरांसारखी ती सारखी तडफडत असते ,ती जगू शकत नाही , मरू शकत नाही ती मुक्या नजरेने बेबंद दुःख पाहत असते ,न केलेल्या गुन्हाची सजा आयुष्यभर भोगत असते ? आसवांहीन अंधाराच्या गर्गेत बंधिस्त मेलेले मन घेऊन फक्त तिचा श्वास सुरू असतो,बाकी ती मेलेली असते . समाजाने पुढे होऊन तिला समजावून घेतले पाहिजे ,तिच्यावरच्या अन्यायाप्रति निष्ठेने लढले पाहिजे , तिच्या आईवडीलांना सहकार्य केले पाहिजे , हाच नितीमुल्यांचा वारसा जपला पाहिजे ,! परंतू ,समाजच जेव्हा आग्यामोहासारख छळतो ,तिच्या यातनांना पाहत नाही
तिला डंख मारत असतो.! तेव्हा विचारशुन्य समाजाला न्यायमागण्याचे भान यावे ,सामर्थ्य यावे अशी सृजनात्मकता दाखवावी तेव्हा कुठे सामाजिक न्याय मागण्याचे सामर्थ्य अंगी येते, स्त्रीवादी संघटनेने पुढे येऊन तिला न्याय द्यावा,तिच्या पाठीशी राहाले ,तिच्या घरच्या लोकांना साह्य करावे, तिला न्यायमिळेपर्यंत समाजाची एकजूट असावी ,या स्वतंत्र भारतामध्ये स्त्रियांनी हा अन्याय कुठपर्यंत सहन करावा?
“कबतक आसू बहाओंगी,तू
उठ ललकारी बन के गुंज जा!
ऐसी तलवार बन के खडी हो तू
खुद के लिए खुद ही लढ जा!
अशा अत्याचाराने मन खिन्न होत असताना ,लोकांनी आता अत्याचाराच्या सोबत लढणे शिकले पाहिजे.आता अन्याय सहन केला जाणार नाही!हे शब्दात सांगून काहीच उपयोग नाही तसे निदर्शने काढून जमणार नाही ,तर घाडसाची पुर्नरावृत्ती करावी लागेल जसे, नागालँड मध्ये अशीच
दुष्कर्माची घटना घडली ?ती घटना आपल्याला खुप काही शिकवून जाते!
२०१५मध्ये नागालँड मध्ये एका स्त्रीवर बलात्कार झाला त्या आरोपीला दीमापूर सेंट्रल जेल मध्ये ठेवण्यात आहे. १०हजार जमावाने त्याला जेलच्या बाहेर काढून सडकेवर नग्न करून शहरात फिरवले त्याला लाथाबुक्यांनी मारून भरचौकात उलटे टांगून जाळले ,तेव्हापासून नागालँड मध्ये एकही बलात्कारीची केस झाली नाही, असे पाहिजे .तेव्हा कुठे महिला भयमुक्त होऊन जगतील !
अन्यायाचा प्रतिकार म्हणून बदलापूरकरानी भारतबंद पुकारला तर इथल्या राजकारणात किती खडबड माजली,आणि बंद होऊ दिला नाही .तो बंद बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ बंद पुकारला होता.पण उच्चनायालयाने कोणत्याही प्रकारचा बंदची हाक देऊ नये असे सुचवले ! परंतू बदलापूरच्या बंदला भारतीय राज्यघटनेचा मूलभूत हक्क होता.अधिकाराच्या कक्षेत बंद होता. कोर्टाने हा बंद मागे घेण्यात यावा असे सांगितले तरी लोक आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत .या ,सरकारने लोकांच्या भावनांची कदर केली नाही हे यामधून कळते की आजचे सरकार दोषींना पाठीशी घालत आहे ! हे स्पष्ट होते.मांजर जशी आपल्या पिंल्लाना जागोजागी लपविते तसेच सरकार या दोषींना लपवत आहे.या जेला मधून त्या जेलाकडे.कधी कधी फरार करत आहे ,
पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अशा घटनांनी हादरून गेला आहे, आता न्याय मागणे आणि अन्यायाला प्रतिकार करणे,हा माणूसपणाच्या विचार आजच्या सरकारने खारिज केला.डॉ, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ,ज्या देशात महिला व पुरुष ,भयमुक्त होऊन जगतात तोच देश प्रगतीचा उच्चांक गाठू शकतो. संविधानानुसार अमलबजावणी न केल्यास विषमत्ता परत आपले डोके वर शकते , त्यामुळे अराजकता फोफावेल .तर याला जबाबदार राजकारणात धर्म गेला तर हुकुमशाही येऊ शकते.हे विधान आज लागू पडत आहे. र्दुदैवाने राजकारणात धर्म गेला आहे .त्यामुळे संविधानानुसार जनतेला न्याय दिल्या जात नाही. नुसत जातीवरून राजकारण केल्या जाते ?’आजच्या वास्तविक अत्याचाराचे खालील मुद्दे लक्षात घेतल्यानंतर कळणार की !
१ बलात्कार ,आणि अत्याचार का केला जातो? यांचे उत्तर मिळेल! या ,भारताला सर्वांत जास्त कलंक जातीयतेचा आहे ब्राह्मण,हिंदू सवर्ण ,या मानसिकतेचा महाकलंक भारताला आहे. मनुस्मृतीच्या अन्यायकारक विधानांची सतत जाणीव करून देणारे इथले भट ,ब्राह्मण ,तर आहेतच परंतू सामान्य लोकांना जातीजातीच्या सततच्या गलिच्छ भांडणातून शिव्यांतून लैंगिक शोषण केल्या जाते !आपण किती मोठे हे किती खालच्या दर्जाचे लोक आहेत ,ही भावना अशाक्रुरतेला जन्म देते!.याचे उदाहरण म्हणजे राजस्थानःमध्ये दलित विद्यार्थींनी शिक्षकांच्या मटक्याला हात लावला म्हणून मरेपर्यंत मार दिला! ..असे कितीतरी आजच्या युगातही घडते. म्हणजे ही विकृती आहे ?
शिक्षक असुनही अश्या क्रुर घटना घडतात म्हणजे त्यांच्यावर लहानपणापासून होणारे संस्कार होत.यासाठी त्यांचे आईवडील ही तेवढेच दोषी असतात?.जे लोक विषमत्ता पेरतात ते शिक्षक होऊच शकत नाही ;तो एक व्यवसायिक कामगार असू शकतो पण शिक्षक नाही..!
बलात्काराच्या मागे जात, धर्म ,तसेच स्त्रियांची दुय्यमत्ता असते ,की स्त्री फक्त पुरुषांची उपभोगाची वस्तू आहे.हा श्लोक मनुस्मृती दिला आहे , त्या मनुस्मृतीला आदर्श मानणारे लोक बलात्कार करतात.!एवढी भयानक विषमत्ता भारतात पाहायला मिळत आहे.!
२,आरोपींना जात ,धर्म,काहीही नसतो .तो फक्त आरोपी असतो हे जरी खरे आहे तरी संस्कारांची याठिकाणी कृती दिसते.किल्मिषगंड दिसतो , एकटी बाई दिसली की,विकृती नराधमामध्ये जागृतं का होते ? कारण , लैगिकतेचे अज्ञानपण ,नशा पाणी ,व्यसन तितकाचा कायद्याविषयी आस्था नसणे,अशा वेळी एकांतात असे प्रसंग घडतात तसेच आँफिसमध्ये सुद्धा विनयभंग होतात .तेव्हा त्या स्त्रीला समाज अपराधी भावनेतून पाहतो ,स्त्री प्रत्येकक्षणी मरत असते .तिचे जीवनच भाजल्या जाते.तिचे पंख छाटल्या जातात ,ती पंखहिन होते.! असे बदफैली नराधम शाळेत सुध्दा वावरत असतात .तेव्हा कोवळ्या कळ्यानांही जाळणारे ते पाशवी हात क्रुरतेने बरबटलेले असतात ,
पुरूषार्थ धर्म,अर्थ काम,आणि मोक्ष हेच जिवन असेल तर मग! विवेकता ,सहनशीलता ,सामाजिक कतृत्वाचे भान महिलांचा सन्मान हे गुण कोण शिकवणार? सृजनात्मक सृजनप्रज्ञेचे धनी व्हायला संविधान माणसाला सांगते ,पण संविधानाच्या उलट वागण्याची जणू प्रतिज्ञाच घेतली असेल तर संविधान काय करू शकणार? आपण पाहिले कि मोठे मोठे महाराज कसे बदलौकिकतेचे बदरग निघाले. मरणाप्राय वेदनाचा विनयभंग करणारे तो विकृत माणूस स्त्रीला दुःख,वेदना ,किळस ,भयभीत जीवन आयुष्यभर देत असतो..
३–बलात्कारी कोठेही असू शकतो,मंदीरात स्त्रीला सुरक्षा नाही,तिला कुठेच सुरक्षा नाही मेल्यानंतर तीन दिवस झाले की म्हणावं ती सुरक्षित आली सुरक्षित गेली .इतका ,माणूस नावाचा प्राणी निर्लज्ज झाला आहे , मदिरालय म्हणजे मदिरा ठेवण्याचा अड्डा,त्याचाच शब्दभ्रम मंदिर झाला .जिथे देवांनी स्त्रियांना दास बनवून त्यांना उपभोगले हे शब्दच जर रात्रदिवस ऐकले त्या पुजार-याने ऐकले तर एकट्या स्त्रीची रक्षा कसा करणार?तो सुद्धा गैगरेप करतो.हे मागेच घडलेले प्रकरण आहे.एक बाई आधार शोधायला मंदीरात गेली.आणि तिथल्या पुजार् यांनी तिचावर बलात्कार केला. ते प्रकरणही दाबण्यात आले.कुठे गेला तो आरोपी ? काय झाले त्यांचे ?
कुणालाच माहीती नाही त्यांना पाठीशी घालणारे राजकीय लोक असतात असे गलिच्छ राजकारण होत आहे म्हणून भारतात एक एका तासाला एक बलात्कार होतो .तरी लोकांनी शांत का बसावं?
“केवल अंधा राजा है
अब गूंगा बहिरा भी है
होठं सिल दिये है जनता के
कानों पर पहरा है!!
४–कोणत्याही वयाच्या स्त्रीवर बलात्कार होतात .ती मग ७०ते ८०वर्षाची का असेना हि विकृती ज्या ठिकाणाहून जन्माला तेच, ठिकाण म्हणजे ,मनोविकृतीचे विकृती चित्रण करणारी मोबाईलवरची दृश्य असतात, जात,राजकारण, वर्चस्वाची भाषा ,आणि अमानुषपणाचा कळस गाठणार् या देशाची भाषा जगाच्या नकाशावर जात आहे! ज्या ,देशात महिलांना सुरक्षा नाही त्या राज्यातील मुख्यमंत्री स्त्रीयांना लाडकी बहीन म्हणून जे कोबंडी सारखे दाणे टाकतात .ते यासाठी आम्ही सत्तेत राहू ,तुमची सुरक्षा महत्त्वाची नसून सत्ता महत्त्वाची आहे.जनतेच्या पैशाची लूट होत आहे.महागाई वाढत आहे ,वासनांध लोक महिलांची छेड काढत आहेत ,लहान लहान मुलीवर एकाच महिण्यात वेळवेगळ्या ठिकाणी बारा बलात्कार कांड होतात .तरी सरकार गुन्हेगाराला शोधू शकत नाही .महिलांना न्याय देऊ शकत नाही तर लाडक्या बहीणीचा भाऊ काय कामाचा ,?असा आक्षेप महिलांच घेत आहेत !
“उठो द्रौपदी वस्त्र संम्भालो
अब ना गोविंद आयेंगें
कैसी रक्षा मांग रही हो
दुःशासन दरवारो से!!
५बलात्काराची जशी कारणे आहेत तसेच त्या प्रकरणातून सुटका करून घेणे .या गुन्हेगारांना माहीत आहे.म्हणूनच कायद्याचा धाक उरला नाही उदाहरणार्थ ,कुणाल पांडेय ,संजोजक BJP ,ltसेल महानगर वाराणसी सत्तेचे पाठबळ ,सक्षम पटेल BJP Lt सेल वाराणसी महानगर,आनंद उर्फ अभिषेक चौहान,BJPltसेल वाराणसी गैंगरेपचे आरोपी दैनिक भास्कर मध्ये आणि टिव्हीवर सुद्धा यांचे सगळे डिटेल्स मिळाले अनेक वृत्तपत्रामध्ये आले तरी त्यांना अटक नाही अशा नराधमाचे तर लिंगच छाटून टाकायला पाहिजे. पण सत्ताधारी लोकांचे पाठबंळ असा लोकांना मिळते म्हणून देशातील सुव्यवस्था कोलमडून पडते,दुसरे असे की त्यामुळे राजकारणी नेत्यांच्या जवळचे लोक ही हिम्मत करतात कारण निर्दोष ठरण्याची शाश्वती असते. बलात्कारामागे असे राजकारण आहे ,अनेक राज्यामध्ये सत्तेत असलेल्या पक्षांशी संबंधित निर्ढावलेले लोक अशा प्रकरणात गुंतले आहेत.
६स्त्रियांसाठी निवडणुकीवर नजर ठेवून योजना आखण्यापेक्षा स्त्रियांना सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी योजना कराव्या.गाव तिथे शाळा आहे.आता सरकारने शाळेचेच खाजगीकरण करण्याचा सपाटा सुरू केला आहे, तर मुलींनी कुठे जावं शिक्षणासाठी ?गरिबमुलीनी काय शाळा सोडून का,घरी बसावं ? महाराष्ट्र सरकारने मुलीसाठी योजना करावी, असा अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला आठदिवसाच्या आतच फाशी द्यावी हे जरी केले तरी मुली स्वतःच्या हिम्मतीवर सक्षम होतात.
७तरूणांना रोजगार द्यावेत .तसेच तरुणांना मैत्रीची भावना शिकवावी जात,धर्म,पंथापेक्षा मी एक भारतीय आहेत सारे भारतीय बांधव माझे बांधव आहेत ही कारुण्याची भाषा त्यांच्या ओठावर यावी मंदीर बांधण्यापेक्षा देश मजबूत करावा .जगाला आता युद्ध नको तर बुद्ध हवा आहे.
शील, नीतीवर भारत बुद्धाचा देश आहे हीच संकल्पना संपूर्ण जगात आहे.आपले मोदीजी परदेशात जातात, अन म्हणतात,
“मै बुद्ध की भूमीसे आया हूँ.असे सांगतात कोणत्याही गुन्हेगार हा गुन्हेगार म्हणून जन्मला येत .तो माणूसच असतो. कोणताही आईवडीलांना वाटत नाही आपल्या मुलगा गुन्हेगार झाला पाहिजे. पण आईवडीलांनी शोधायला पाहिजे,याचे मित्र कोण आहेत कोणासोबत राहतो.जातीची .मारण्याची ,स्त्रीविषयक असे शब्द का वापरतो.त्याचे निरक्षण करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे .शेवटी आईवडिल चांगले असतात तेव्हा मित्र परिवारासोबत तो बिघडतो ,तसेच शैक्षणिक स्तरावर जबाबदार सांविधानिक शिक्षणनितीचा वापर करावा,लैंगिक शिक्षण हे शाळेतून मिळणे ,आवश्यक आहे ,मुलांच्या मानसिकता ओळखून त्यांच्या प्रश्नांची शिक्षकांनी उत्तरे द्यावीत, लोकांच्या मनात आदरणीय रूपात प्रस्थापित करावी..
– सुनीता इंगळे
मुर्तिजापूर
7218694305