हिवाळ्यात आवर्जून खा बाजऱ्याची भाकरी…
हिवाळा हा ऋतु खाण्या-पिण्याची मजा असणारा मानला जातो. या दिवसांमध्ये वेगवेगळे पौष्टिक पदार्थ, फळं-भाज्या खाऊन तुम्ही तब्येत चांगली बनवू शकता. पण हिवाळ्यात आरोग्यासंबंधी अनेक समस्याही होतात. आपलं पचनतंत्र योग्यपणे काम करू शकत नाही. अशात ही समस्या दूर करण्यासाठी एक उपाय करू शकता. हिवाळ्यात तुम्ही नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे…
* पचनक्रिया सुधारते…
या थंडीच्या दिवसात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. बाजरीच्या भाकरीने पचनक्रियेत खूप सुधारणा होते. त्याशिवाय अपचन, बद्धकोष्टता आणि पोटदुखीसारख्या समस्याही दूर होतात.
* इम्यूनिटी बूस्ट करा…
जर तुम्हाला बाजरीची भाकरी आवडत नसेल तर किंवा त्याची टेस्ट आवडत नसेल तर भाकरी करताना त्यात हिंग, लसूण आणि काळं मीठ टाका. याने भाकरीची टेस्ट वाढेल आणि लसणातील पोषख तत्वांनी इम्यूनिटीही बूस्ट होईल.
* एनीमियाचा धोका टळतो…
तुम्हाला माहीत नसेल, बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं. आयरन कमतरता असणाऱ्या लोकांसाठी बाजरीची भाकरी रामबाण उपाय मानला जातो. याने एनीमियाचा धोकाही कमी होतो.
* ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं…
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, बाजरीची भाकरी हृदयाच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. याने नसांमधील ब्लॉकेज कमी केलं जातं आणि त्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होतं. तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी राहतो.
– कुमार चोप्रा,
८४८४९१७१७१,
– सुनील इनामदार,
९८२३०३४४३४.