डॉ. सुजय विखे यांना सर्वसामान्य नगरकराच अस्सल ग्रामीण भाषेत सवाल?
*डाकटर सुजेराव राम राम….!
काल म्हण एक्या”सभेत बोलताना तुम्हीभलतंच बरळून गेलं तुम्हांसणी हय” बी माहीत नाय व्हय.ह्यो मतदार आन मतदारसंघ ग्रामीन हाय. काय सुजेराव ! आव्ह लकें साह्यब”म्हणे तुमच्या सारख जर ,इस” दिसात बोलू लागल तर म्या फारम भरणार नाय .अस तुम्ही बोलला त्य ” खर हाय का? समोरचा पैलवान चित करील म्हणून तर हय असलं काही बाही तुम्ही बोलत तर नाय ना .नाय म्हंजी आमच्या भाषेत बोलायचं म्हणल्याव सुजेराव तुमची टराकली म्हणायची.उग नको ते बरळून राहिले ना तुम्ही.
.आता लकें साह्यब आपल्या साध्या सरळ मास्तरच्या पोटी जलमाला आल, त्यांच्या आजूबाजूला,घरी,जशी बोली बोलतात तसच ते बोलणार ना! बर ते आमदार बी व्हते ते. तव्हा नाय त्यांची बोली आड आली बर का कुड. उलट आर आर आबा त्यांच्यात लोकासणी दिसलं .आव्ह सुजेराव त्यांच्या मतदारसंघात ते आमदार असताना १०००ते १५००कोटींची काम झाली.तव्हा नाय त्यांची बोली आड आली.बर हया मतदारसंघातील माणस असच बोलत्यात.भाषा ही ठराविक अंतरावर बदलत जाती.आन भाषा नेमकी काह्या साठी असती व्हो सुजेराव .त्य तुम्हांसणी माहीत नसल तर सांगतो.ती असती संवादसाधण्यासाठी आपलं बोलणं दुसऱ्याला कळाव त्या साठी.आता तुम्ही ग्रामीण बोलणाऱ्या लकें साह्यबा वर नव्ह तर आमच्या सारख्या समद्या ग्रामीण बोलणाऱ्या वर हय बोललं हाय!अस म्हणायचं. म्हंजी तुम्ही आम्हांसनी येड्यात जमा करता की काय सुजेराव.
दुसर म्हंजी तुमचा मंत्री व्हय व्हय रेल्वेराज्यमंत्री दानवे साह्यब कस बोलतात हो. त्याना कोणी नाय म्हणलं तुम्ही अस का बोलता म्हणून.आन त्याच बोलणं बी आडव नाय आलं त्यांच्या कामात. दूसर म्हणजे हुकुम देव नारायण यादव यांची जरा संसदेत केलेली भाषण ऐका मग समजन बोली कशी हाय त्य महत्वाचं नाय तर तुमचं काम महत्वाचं असतया. धाराशिव चा गडी ओम राज निंबाळकर भी माहीत असतील तर कस बोलत्यात ते समजून घ्या अजून लै नेते हाय सुजेराव! समद नाय सांगत बसत.
तुमचं घर साहित्यिक पुरस्कार देत.तव्हा म्हणलं तुम्हांसणी भाषेबद्दल प्रेम असलं.पण तस नाय तर सत्ता पाहेल, त्या साठी टीका करावी पण ही लकेंसाह्यबा वर केलेली टीका तुमच्या अंगलट येणार. आव्ह सुजेराव! तुम्ही आमचं लोकप्रतिनिधी व्हणार आन व्हत बी.तुम्ही आमच्याच भाषेला नाव ठेवणार हा आमचा अपमान नाय तर काय हाय! आम्हाला खासदार सुध्द बोलणारा नग तर काम करणारा पाहेल
आन हय ध्यानात ठेवा कुठली ही भाष्या”, ही त्या त्या भागचा वैभवसंपन्न वारसा आन सांस्कृतिक ठेवा असतो.आन तुम्ही त्यालाच नाव ठेवतअसाल तर तुम्हाला खासदार का करायचं ह्यो प्रश्न डोसक्यात घुमतोय.
आहो सुजेराव कुसुमाग्रज यांनी लिवलं हाय बघा!
*भाषा मरता देश ही मरतो*संस्कृतीचा दिवा विझे…….*
त्या मूळ तुम्हांसणी यंदा माफी नाय……..
*एक नगरकर……*