Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील
रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे मानवी आयुष्यातील सेवाधर्माला एक उदात्त,अत्युच्च अस्थान प्राप्त करून एक पवित्र रहस्यमयी ब्रिदवाक्य आहे.त्याला अनुसरून आजही अनेक उच्चशिक्षित सेवाव्रती जीवनातील मानवतावादी तत्वज्ञानाचा अंगीकार करून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहेत.
रूग्णांना व्याधीमुक्त आणि त्यांच्यासोबत परिवारातील सदस्यांनाही नव्या जीवनाचा उपहार प्राप्त करून देणे हे समाजातील काही डॉक्टरांचे प्रभावी मानवसेवी कार्य आजही सुरू आहे.याच तत्वप्रणालीने विधायक आणि विनम्र सेवाभावी वृत्तीची कसं धरून आपण अत्यंत जटील अशा मानसिक आजार निवारणाच्या निदान आणि उपचार क्षेत्रात एक सामाजिक आणि आध्यात्मिक सेवक म्हणून सक्रिय आहात. आयुष्यात प्राप्त या मौलिक उपलब्धींबध्दल आपणास अभिमानंदनासह सन्मानित करण्यात येत आहे.
अहोरात्र गच्च भरलेल्या रूग्णांची तपासणी करीत राष्ट्राचे भावी आधारस्तंभ समाजातील तरूण आणि देशाच्या आर्थिक विकासाचा मुलाधार अन्नदात्या शेतकऱ्यांच्या वैचारीक आणि मानसिक स्वास्थाच्या स्थितीत बदल घडवून आणण्यासाठीही आपण चिंतनशील असता.यासाठी विद्यार्थ्यांचे मनोस्वास्थ आणि आणि सकारात्मक विचारांनी आत्मबल वाढविण्याच्या व्यक्तिमत्वासाठी आपण काही कृतिशील उपक्रम राबविलेले आहेत.त्याचप्रमाणे ढासळलेल्या आर्थिक व्यवस्थेने गलितगात्र होऊन आत्महत्त्यांची विनाशी पाऊले उचलण्याचा अविचार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण देवदुताप्रमाणे पुढे आला आहात.हा टोकाचा अविचार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण विनामुल्य समुपदेशन,मानसिक आजारांचे निदान,उपचार व औषध वितरणाचे एक उदात्त कल्याणकारी असे शेतकरी आत्महत्त्याविरोधी अभियान आपण हाती घेतलेले आहे.आपणही बुलढाणा जिल्ह्यातील एक शेतकरी पूत्र असल्याने ग्रामीण जनजीवन आणि शेतकऱ्यांच्या समस्या आपण लहाणपासूनच समजून अभ्यासले ल्या आहेत.
“मन करा रे प्रसन्न तेच सकल सिद्धीचे कारण” असे संत विभूतीही पूर्वापार सांगत आल्या आहेत.सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयेत विविध क्षेत्रातून योगदान देणाऱ्या माणसाचे मन निरोगी ठेवणे यातच भौतिक आणि मानसिक आणि सामाजिक प्रगतीचे रहस्य साठवलेले आहे.चार चाकी गाडी कितीही लाखांची मौलिक असली तरी तिचे इ़जीनच व्यवस्थित नसेल तर ती पुढे जाणारच नाही.त्याचप्रमाणे नुसतं शरीर कितीही धिप्पाड असलं तरी त्यातील यंत्र म्हणजे मनच निरोगी आणि भ़वेदनशील नसेल तर ती व्यक्ती म्हणजे बंद पडलेली गाडीच असेल.
अशा बंद पडलेल्या अभागी गाड्यांची दूरूस्ती करून त्यांना गती देणे एक मानसोपचार तज्ञ म्हणून आपली सुरू असलेली ही महत्वपूर्ण सामाजिक सेवा साधना आहे.अनेकांना उपचार आणि समुपदेशनाचे आपण मानसिक आजारातून मुक्त करण्यासाठी श्रेय वादी वृत्ती टाळून आध्यात्मिक अधिष्ठाणांना साक्ष ठेऊन आपले सेवाकार्य करीत आहात. स्वतःच्या आरोग्याच्या किंवा तत्सम अडणींचा विचार न करता सेवा परमो धर्म धर्म आपण समाजासाठी सिध्द आहात.त्यासाठी अर्थार्जन हा वाषय अत्यंत गौण ठेऊन आपण अनेक रूग्णांना व्याधी मुक्त आणि कुटूंबियांना त्रास मुक्त जीवन बहाल करण्यासाठी आपल्या व्यापक क्षमता सिध्द करीत आहात.याचा आमचे मित्र म्हणून आमच्या पत्रकार समुहाला ही सार्थ अभिमान आहे…!
सामाजिक ऋणमुक्तीच्या नियतीने आपणास बहाल केलेल्या या मौलिक सेवा कार्याच्या उपहाराबध्दल आपले पूनश्च अभिनंदन आणि आपल्या निरामय,सदैव आनंदी आणि यशस्वी कौटूंबिक,सामाजिक आणि रूग्णसेवेच्या वाटचालीसाठी आपणास मन:स्वी अनंत शुभेच्छा…!
– संजय देशमुख
अकोला