मानसशास्त्र Psychology सायकॉलॉजी – मानवी मन आणि वर्तणूक यांचा अभ्यास करणारे शास्र म्हणजे मानसशास्र. जर्मन तत्वज्ञानी रुडॉल्फ गॉकेल १६व्या शतकात हा इंग्रजी शब्द आणला. Psyche साईक’ (मन)’ आणि Logus लोगस (शास्त्र) यापासून हा शब्द तयार झाला. थोडक्यात या शब्दाचा ग्रीक भाषेत अर्थ आत्म्याचे शास्त्र.
मानवी वर्तनाचा केलेला अभ्यास तसा सोपा नाही. व्यक्तिगणिक त्यात वैविध्यता दिसून येते. पिंड पिंड मतिर्भिन्ना या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा आयक्यू वेगवेगळा असतो त्यानुसार त्याचे वर्तन बदलत असते. या वर्तनाचा अभ्यास करतांना विविध प्राण्यांवर आधी प्रयोग करावे लागतात त्यानुसार त्यांनी कारणमीमांसा कळत असते. इतरांच्या मनाचा अभ्यास करून त्याच्या मनातले काढून त्याला आपल्या मनाच्या प्रवाहात आणणे हे एक कौशल्य असते. असे कौशल्य कुणालाही जमत नाही. त्यासाठी त्याला ध्येयवेडा व्हावे लागते. जो पर्यंत तो ध्येयवेडा होत नाही तोपर्यंत उद्दिष्ठ साध्य होत नाही. वेड्या माणसाला शहाणा करायचे असेल तर आधी स्वतःला वेडा व्हावे लागते. अशाच एका ध्येयवेड्या माणसाची ही कथा…..
डॉ सुजय पाटील हे नाव आज विदर्भासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कोणाच्या मुखात नाही असा व्यक्ती सापडणे विरळाच..! ग्रामीण भागातून शालेय जीवनाला सुरुवात केलेले सुजय पाटील यांनी कधी डॉक्टर पदवी मिळवली हा कौतुकाचा विषय आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, शैक्षणिक सुविधांचा अभाव, दळणवळणाचा अभाव, अशा कठीण काळात शिक्षण घेऊन आपणा समाजाचे काहीतरी देणं लागतो ही उदात्त भावना मनात ठेवून सुजय पाटील यांनी डॉक्टर या पदवीने सन्मानित असताना केवळ आणि केवळ गरीब, होतकरू, कष्टकरी समाजाच्या उत्कर्षासाठी समोर असलेले वैभव झिडकारून या तळागाळातील बांधवांसाठी अहोरात्र सेवा देणारे डॉ सुजय पाटील हे एक ध्येयवेडा अवलिया म्हणावा लागेल.
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्रासह खेडोपाडी प्रसिद्ध असलेले डॉ सुजय पाटील एक हरहुन्नरी, ध्येयवेडे व्यक्तिमत्व. परिस्थितीतून शिकून मोठे झाले त्या परिस्थितीची जाणीव ठेवून समाजात आपले वेगळे स्थान मिळवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे ९ जुन १९७१ रोजी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन स्वतःच्या कार्यकर्तुत्वाने समाजात राहून समाजाची सेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगून आज ज्या मातीतून डॉ पाटील आलेत त्या मातीतील तळागाळातील लोकांच्या जनकल्याणासाठी झटताना दिसतात. त्यांच्या कक्षेत येणाऱ्या शेतकऱ्याला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत चालू असतात. दिवस असो वा रात्र, पहाट असो वा अर्धीरात कधीही सेवेसाठी हा अवलिया स्वतःला झोकून देवून सेवा करत आहे.
ज्या समाजाने आपल्याला मोठे केले त्या समाजाला आपण विसरता कामा नये, समाजातील प्रत्येक घटक हा आपल्या आयुष्यात काहीतरी उपयोगी येत असतो, अशा घटकाला आपण वेळीच मदत केली तर तो आपल्याप्रती कृतज्ञता बाळगतो. ग्रामीण जीवनाचे बाळकडू प्यालेले डॉक्टर समाजातील शेतकरी, कष्टकरी, अनाथ, अशा लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे हाच खरा मानवी मनाचा धर्म आहे असे ब्रीद वाक्य मनाशी ठेवून गावपातळीवर त्यांनी साखर पेरणी केली आहे. अनेक समस्याग्रस्त व्यक्तींच्या जीवनात समोपचाराने बदल घडवून अनेक महिला भगिणींच्या भाळावरचे कुंकू वाचवले आहेत, कुणाच्या संसारात कलह होत असेल तेथे योग्य मार्गदर्शन करून डॉक्टरांनी अनेक कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचवले आहेत.
मानसिक संतुलन बिघडलेले रुग्णाना त्यांच्या कलेकलेने समोपचाराने त्यांना संतुलित करणे हे खूप अवघड काम.. त्यासाठी त्या रुग्णाचा पूर्ण अभ्यास करावा लागतो, त्याच्यावर कोणता प्रभाव झाला आहे हे पाहून त्यावर योग्य समोपचार करावा लागतो. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो हे सर्व डॉक्टर नाममात्र (अत्यल्प) शुल्क घेवून सेवा देतात.
डॉक्टर स्वतः शेगावच्या गजानन महराजांचे भक्त असल्याने त्यांच्यात सात्विक, धार्मिक आणि सामाजिक कार्याची बीज रुजली गेली आहेत. स्वतःची प्रतिष्ठा बाजूला ठेवून रात्रंदिवस अशा रुग्णांसाठी झटणारा हा अवलिया देवमाणूस म्हणावा लागेल. अंगात नवचैतन्य, नवा जोश, नवी उर्जा घेऊन डॉक्टर समाजाची सेवा करत आहेत.
अशा या देवमाणसाला पुढील भावी समाजसेवेसाठी खूप खूप शुभेच्छा..!
—————
डॉ. सुजय पाटील
एम.बी.बी.एस.डी.पी एम.
मानसोपचार तज्ञ,अकोला
मो.९८ ५० ८१ ०३ १९.
————————–
– प्रशांत वाघ
पिंपळगाव जलाल
ता.येवला, जि.नाशिक
पिन-४२३४०१
संपर्क- ७७७३९२५०००
————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
1 thought on “Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – ‘ध्येयवेडा डॉक्टर’”
धन्यवाद सर, आपण आम्हाला डॉ. सुजय पाटील या व्यक्तिमत्वावर लिहण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद.. खरे तर व्यक्तीपरत्वे प्रत्येकाच्या अंगी काही सर्वसामान्य गुण असतात, मात्र याला डॉ सुजय पाटील अपवाद आहेत, डॉ सुजय पाटील यांच्यातील हे गुण सर्वसामान्य नसून अलौकिक आहेत. ज्या गुणांची उंची ठरवणे आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे. डॉ. पाटील यांच्या कार्याला हजारदा सलाम ..
धन्यवाद सर, आपण आम्हाला डॉ. सुजय पाटील या व्यक्तिमत्वावर लिहण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद.. खरे तर व्यक्तीपरत्वे प्रत्येकाच्या अंगी काही सर्वसामान्य गुण असतात, मात्र याला डॉ सुजय पाटील अपवाद आहेत, डॉ सुजय पाटील यांच्यातील हे गुण सर्वसामान्य नसून अलौकिक आहेत. ज्या गुणांची उंची ठरवणे आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे. डॉ. पाटील यांच्या कार्याला हजारदा सलाम ..