Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र

Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, अनेक संकटातून स्व कर्तुत्ववाने, शिक्षण पूर्ण करुन अहिक जीवन सुखासमाधानाने डाॅ. सुजय पाटील यांना जगता आले असते पण तेही एम. बी. बी. एस. ची वैद्यकीय पदवी पदरात असतांना. हा अवलीया सर्व सुखाला लाथाडून शेतकरी बांधवाविषयी सेवा करण्याचे वेड डोक्यात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा, जीवन जगण्यासाठी चैतन्य देणारा फकीरच. त्याच्या या कार्यास लाख लाख प्रणाम.

दुस-याच्या विषयी मनात ममत्व निर्माण होणे तेही आजन्म कार्यरत राहणे ही साधी सोपी गोष्ट नाही. एवढी मोठी पदवी असतांना इतरासारखे पैशाच्या पाठी लागून मोठे इमले बांधून ऐटीत जीवन सहज जगला आले असते. ते झुगारून हा अवलीया कास्तकार कुटुबातील असून स्वप्रयत्नाने शिक्षण घेऊन परिश्रमाने स्वतःचा विकास करतांना कास्तकारबांधवांना बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्याचा संकल्प करुन राहत नाही तर त्यासाठी अविरत कार्य करीत आहे. या परमार्थाच्या अभियानाची पालखी घेऊन कास्तकार कास्तकारांच्या, शेतकऱ्याच्या जीवनात संजीवनी पेरत निघालाय, सुवासिनीला तिच्या हरवू पहाणाऱ्या कुंकवाचे रक्षण करीत, अश्रू पुसत, कोण्या म्हाताऱ्या बापांची जीर्ण झालेल्या जीवात अमृत पेरत निघालात, हेच त्याच्या जीवनाचे संकल्प. त्यांच्या या कार्याच्या पालखीचा भोयी आपण का होऊ नये.?

दु:ख, दैन्य, उपासमार, कर्ज, सावकार, अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिपाऊसात पिकाची नासाडी, पूर, चोरी, लूटमार, अज्ञान या अशा अनेक कारणामुळे आजमितीला शेतकरी आत्महत्या करतोय जीवन जगतांना त्याची होणारी ओढाताण सहन न करण्यापलीकडची असते. सरकारी धोरणे नुसत्या कागदपत्रांच्या फायलीत दिसतात पण वास्तव याहीपेक्षा भयानक आहे. अशा वेळी त्याच्या जवळ कोणताच मार्ग शिल्लक नसल्याने तो जीवन संपविण्याचा मार्ग स्वीकारतो. अशावेळी डाॅ. सुजय पाटील त्यांचे प्रबोधन करुन त्यांच्यात चेतना निर्माण करीत आहेत. हरवू पाहणारा आनंद मनामनात पेरण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

या संकल्पना विषयी विचार करायला गेलो तर आपणास दिसून येते की, हे काम तीन पातळीवर होतं आहे पहिल्या पातळीवर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटू देऊन आत्महत्या कारणांची घटनास्थळी शहनिशा करुन व त्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी शासकीय यंत्रणेला हातभार लावत आहेत. दुस-या पातळीवर ठिकठिकानी ग्रामसभा घेऊन किंवा आवश्यक त्या ठिकाणी शोकसभा घेऊन झालेल्या वाईट प्रसंगाविषयी आत्मचिंतन करण्यास गावकऱ्यांना प्रवृत्त करत. या चितंन प्रक्रियेचा आरंभ करण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा प्रश्न तो आपला प्रश्न अशी भूमिका घेऊन सामाजिक बांधिलकिला बळकटी देत, सामुहिक चिंतनाने गावातील प्रश्न सोडवण्यासाठीची सवय लावण्याचा प्रयत्न करत. या चिंतनासाठी आवश्यक असलेली वैज्ञानिक व तांत्रिक माहिती ग्रामस्थांना देवून प्रबोधन करीत आहेत. तिसरे असे की, विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देवून तेथील समस्यांचा व समस्यातील संभाव्य तोडग्याचा सविस्तर अहवाल सबंधित मंत्रालयाकडे सादर करुन शासकीय यंत्रनेला सहकार्य करुन शेतकऱ्यांना दिलासा आत्मविश्वास निर्माण करीत आहेत. या अशा उपक्रमाचा शेतकऱ्यांना उपयोग होऊन होणारे अनर्थ टाळण्याचे महत्वाचे काम स्वतः अविरतपणे करीत आहेत. आणि प्रसंगी संबधित मंत्रालयाकडे पाठवून त्यांचा पाठपुरावा ते करतात. समाजाने एकत्रीत येऊन बळीराजाच्या खांद्यावरील ओझे हलके करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

डाॅ. सुजय पाटील हे स्वतः मानसोपाचार क्षेत्रात काम करीत असलेले तज्ञ निराश, असाह्य, चिंता, नकारात्मक भावना अशा वैफल्याग्रस्त शेतकरी बांधवांना सदोपदेश देत त्यांच्या जीवनात संजीवनी आणण्याचा प्रयत्न करुन आत्महत्या प्रतिबंध अभियान चालवत आहेत. त्यातून शेतकरी नैराश्य झटकून हसत संकटावर मात करीत आहे. इतकेच नाही तर पिडीत शेतकऱ्यांना संपूर्णत: मोफत व विनामूल्य इलाज तर इतरही मानसिक रुग्णांना उपचार तेही नाममात्र फक्त ३० रुपये इतक्या कमी पैशात सोय करीत आहेत आणि विशेष म्हणजे दिवसागणिक ते कमीत कमी चारशे ते पाचशे लोकांना आपल्या पाटील हॉस्पिटल अकोला येथे उपचार करतात. हे विशेष आहे यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती दिसते. अविरत कष्ट करुन जीवाचे रान करीत आहे. महाराष्ट्र व बाहेरच्या राज्यातील शेतकरी याचा लाभ घेत आहेत. मात्र डाँ सुजय पाटील साहेब प्रसिद्धीपासून कोसोदूर आहेत. शिवाय ते स्वतः गुरुमाऊली गजानन महाराज शेगावचे परमभक्त असल्याने प्रत्येक गुरूवारी उपचार घेणाऱ्या शेतकरी रुग्ण व इतर रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना ते मोफत जेवण देतात हे विशेष.

पिडित शेतकरी बांधवांना बरे करण्याकरिता विविध औषधे, इंजक्शने, आत्महत्या प्रतिबंध समुपदेशन, त्यांच्या पुनर्वसनासबंधी मार्गदर्शन व इतर उपाययोजना आहेत ते स्वतः खर्च करीत आहेत. गरजू व पिडित शेतकऱ्यांना योग्य शैक्षणिक व वैज्ञानिक ज्ञान देवून त्यांना योग्य सल्ला, उपदेश, व मार्गदर्शन करुन त्यांना हातभार लावण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. पिडीत शेतकऱ्यांना मानसिक परिक्षण व तपासणी, औषधोपचार, नार्कोचाचणीद्वारे सकारात्मक विचाराचे रोपण, आत्महत्या प्रतिबंध समुपदेशन, व मानसोपचार या सेवा ते देवून शेतकऱ्यांना आदर्श जीवनाचा मंत्र ते देतात. यावरून त्याच्या मनातील तळमळ, कळवळा दिसून येईल.

नकारात्मक परिस्थितीमुळे हतबल शेतकऱ्यांची मनाची जी अवस्था आहे ती साधी बाब नसून अतिशय गंभीर बाब आहे हा आजार एकटा कधीच दूर करु शकत नाही. तर समाजातील प्रतिष्ठित व तज्ञ व्यक्ती, हताश झालेल्या शेतकरी बांधवासाठी आत्महत्या करण्यापासून परावृत्त करु शकतो. या अभियानात अशा व्यक्तीने व कृषी विद्यापीठाचे तज्ञ मंडळी, शासकीय कृषी यंत्रणेचा अधिकारी वर्ग, समाज कल्याण विभागाचा अधिकारी, कृषी विकास बँकेचा अधिकारी, जलसंवर्धन व जलसंपदा विभागातील तसेच शासकीय आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, या सारख्या स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्रभावशाली शेतकरी नेते, व राजकिय क्षेत्रातील पुढारी, वृत्तपत्र व प्रसारममाध्यमं क्षेत्रातील व्यक्ती पत्रकार, सामाजिक व आध्यात्म्यिक संस्थाचे आदरणीय संस्थापक, सेवाभावी वृत्ती असलेले समाजभिमुख नागरिक अशा सर्व स्तरातील व्यक्तिच्याद्वारे अभिनव पँनेल तयार करुन हे कार्य सिद्धीस नेवू शकते. व अशा प्रकारच्या सहकार्याने डाॅ. सुजय पाटील कार्य करीत आहेत यात हातभार लावण्याची आपलीही सामाजिक जबाबदारी नाकारून चालत नाही. चला तर या अभियाचे आपणही एक भाग होऊन समाज ऋण फेडू या..!

महात्मा गांधीजींनी खेड्याकडे जाण्याचा मंत्र दिला त्यांचा वसा घेऊन खेड्यातील शेतकरी बांधवासाठी झटून बाबा आमटे, प्रकाश आमटे, संत गाडगेबाबा, ज्योतिबा फुले, तुकडोजी महाराज यांचा वारसा अविरत चालवत आहे. डाॅ. सुजय पाटील यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. समाजातील लोकांची सेवा करण्यासाठी त्याच्या बळाचे कौतुक किती करावे? अशा भावनिक आधार देणाऱ्या अवलियाला माझे लाख लाख प्रणाम..!

 

 

 

 

 

 

 

 

 

डाॅ. सुजय पाटील

एम.बी.बी.एस.डी.पी एम.

मानसोपचार तज्ञ,अकोला

मो.९८ ५० ८१ ०३ १९.

    • शब्दांकन

 

मुबारक उमराणी

सांगली

९७६६०८१०९७.

 

 

 

 

 

 

 

 

 

बंडूकुमार धवणे

संपादक

गौरव प्रकाशन, अमरावती

९९६०२२५२७५

    ————–

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

-बंडूकुमार धवणे

    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–
Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram