वक्तृत्व स्पर्धा म्हणजे कर्तुत्वान माणसे निर्माण करण्याची कार्यशाळाच – डॉ. पुरुषोत्तम पाळेकर
गुरुकुंज मोझरी (प्रतिनिधी) :महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ह्या युवकासांठीच असल्यामुळे त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहीत्याची व कार्याची जाणिव होणे महत्वाचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या व्यासपीठावरील वक्तृत्व स्पर्धा म्हणजे कर्तुत्वान माणसे निर्माण करण्याची कार्यशाळा आहे. त्यामुळे महाविद्यालयीन युवकांनी महाराजांच्या विचारांपासुन प्रेरणा घेवुन समाज व राष्ट्राच्या प्रगतीचे वाहक व्हावे असे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे आरोग्य विश्वस्त प्रमुख डॉ. पुरुषोत्तम पाळेकर यांनी केले.
ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 55 व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालया अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते. ते पुढे बोलतांना म्हणाले की, सन् 1989 मध्ये नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. दादासाहेब काळमेघ यांनी राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात वक्तृत्तव स्पर्धेचा समावेश असावा अशी संकल्पना मांडली होती तेव्हापासुन म्हणजे ४3 वर्षापासून आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा अविरत सुरु असुन त्याचा मला मनस्वी आनंद आहे. असेही बोलतांना ते म्हणाले.