म्हातारपण लवकर नको ? तारुण्य टिकवण्यासाठी ‘हे’ करा 5 आयुर्वेदिक उपाय…..
तरुणांनाच काय, तर वयोवृद्धांनाही आपण चिरतरुण राहावे, असे वाटत असते. यासाठी म्हातारपण लवकर येऊ नये, यासाठी काय करायला हवे, अँण्टीएजिंग प्रोसेस कशी करावी, याविषयी आयुर्वेदात माहिती देण्यात आली आहे. म्हातारपण येऊ नये किंवा आलेलं दिसू नये, यासाठी काय करायला हवं, याविषयी आयुर्वेदात 5 उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया…
* भरपूर ऑक्सिजन शरीराला मिळेल, हे पाहा…
शरीराला जेवढा ऑक्सिजन मिळेल तेवढी प्रत्येक पेशीला नवीन ऊर्जा मिळेल. झाडाला पाणी मिळालं की, ते तरारून वर येतं. त्याचप्रमाणे शरीरालाही ऑक्सिजनची आवश्यकता असते. प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची आवश्यकता असते. लिवर, किडनी, फुफ्फुस, मेंदू अशा सगळ्या अवयवांना ऑक्सिजन मिळाला की, हे सगळे अवयव चिरतरुण राहण्याकरिता मदत करतात. यासाठी दीर्घ श्वसन करा. जाणीवपूर्वक श्वास घेऊन श्वास रोखून ठेवा. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. यामुळे वाढवलेली ऑक्सिजन पातळी तुम्हाला म्हातारपण द्यायला येणार नाही.
* दिवसातून किमान तीन वेळा अंघोळ, भरपेट जेवण आणि 2 वेळा हलका आहार घ्या…
तीन वेळा अंघोळ केल्याने उत्साहात वाढ होते. अंघोळीनंतरची 15 मिनिटे आनंदात जातात. कारण यामुळे पेशीत नवीन चैतन्य येतं. त्वचेची बंद झालेली छिद्र मोकळी होतात. धूळ, धूर, प्रदूषण यामुळे पेशींवर आलेली धूळ मोकळी होते.
* योग्य वेळी जेवण घ्या…
आहाराच्या वेळा पाळा. जेवणात भरपूर तेल, तूप घ्या. तेल-तूप जेवढं घेता येईल तेवढं घ्या. केसांत तेल घाला. डोळ्यात काजळ, कानात तेल घाला. संपूर्ण अंगाला तेलाने मसाज करा. त्यानंतर अंघोळ केलीत, तर जास्त फायदा होईल. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढत जाईल. पोट साफ होईल. पित्त कमी होईल. तेल लावून सूर्यनमस्कार घातले तर खूपच फायदा होईल.
*इंद्रियांची शक्ती वाढण्यासाठी दररोज ध्यानधारणा करा….
सकारात्मक राहा. माझ्या फायद्यासाठी ही सगळी सृष्टी आहे, असा भाव मनात ठेवून ध्यान करा. यामुळेही तारुण्य टिकवण्यासाठी मदत होईल.
* पुरेशी झोप घ्या…
झोपल्यामुळे शरीरातील रक्तपुरवठा संतुलित अवस्थेत येतो. यामुळे सगळ्या अवयवांना रक्तपुरवठा होतो. यामुळे सगळे अवयव निरोगी राहायला मदत होते. यामुळे दैनंदिन कामेही करायलाही मदत होते. शारीरिक विश्रांती पुरेशी घेतली, तर दिवसभरातील कामे पूर्ण करायला मदत होते.
– कुमार चोप्रा,
– सुनील इनामदार