च्युत्या समजता का ?
एकरी सोयाबीन च उत्पादन सरासरी प्रत्येक कास्तकार सहा क्विं. जरी धरलं, मंजे हेक्टरी पंधरा क्विं.
कापसाच सरासरी एकरी सहा क्विंटल उतारा धरला, मंजे हेक्टरी झाल पंधरा क्विं.
आता शासन भाव फरक म्हणून देत हाय हेक्टरी पाच हजार रू.
आता आपल्या पासून मांगच्या वरीस यायन घेतला छत्तीस शे ते चार हजार रु मंजे सरासरी धरा अडतीसशे
मंजे आता
3800 x 15 क्विं.=57000
57000+5000 शासनाकडून मिळनारी मदत = 62000
आता याले भागा 15 क्विं न ,
त पंधरा क्विंटल ले क्विटल मांग भाव मिळून रायला 4133.33
● हे वाचा –मी भारत माता बोलतेय
मंग मले हे सांगा
हागलं अन पोट गेल एकच झाल ना
आजा मेला अन नातू झाला
मंग सरकारन काय लय मोठा तीर मारला का ?
आपलच मुत आपल्याले पाजत हाय…
तवा तवरू नका
भाव फरकाचे पाच हजार आले, पाच हाजार आले मणून…
निक्काल ठोकली आपली
हेच जर सात हजार भाव देल्ला असता त 15 क्विं.चे रूपय आले अस्ते 105000 मंजे तुमचा नगदीत या सायाच्यायन घाटा केला
43000
अन तुमी काय हे पाच हजार रुपय घेवून बसले…
जस सोयाबिनच गणित हाय तसच गणित कापसाच बी हाय…
तवा या सरकारच गणित लावा लागते
हे पाच हजार घ्या
हे आपलेच आपल्याले देत हाय, हे काय कुठ खंत्या खोदाले नाई गेल्ते, की मारुन घेवून देवून नाई रायले…
अन यायले अशी आदळणी द्या की यायच्या बापान नाई पायल पायजेन…
आपल्याले भाव फरकाची मदत नाई पायजेन
हमीभाव पायजेन… हमी भाव…
– विजय ढाले
#बिब्बा