खरच तुला शिवाजी कळला का ?
तू कधी तरी
खरा शिवाजी वाचला का ?
का नुसताच गळा फाडून
शिवाजी राज्यांचा
उद्धघोस करतो
हिंदू मुस्लिम दंगलीत
खरच तुला माहीत आहे का
शिवाजी महाराजांचे
अंगरक्षक
आरमार प्रमुख ….
राजांचे गुरू
फाडून टाक खोट्या इतिहासाची रद्दी पाने
उघड्या डोळ्यांनी वाच
रयतेच्या राजाचा खरा
इतिहास
तेव्हा कळेल तुला
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
शेतकऱ्यांचे कैवारी
स्वातंत्र्य समता बंधुत्व
न्यायाचे पुजारी
उगीच म्हटले नाही
दिल्लीचे तख्त राखतो
शिवराय माझा
अठरा पगड जातींचा
पोशिंदा
जिजाऊचा लेक कळेल तुला
मावळ्यात राहून
नुसता भक्त बनून
नको गाऊ राजेंचे खोटी कवने
धर्म आणी जातींच्या
पलीकडे जाऊन
घडवला भारत
शिवबाने …….
स्वराज्यात कुठलेच देवळे बांधून अंधभक्तीचा
जागर केला नाही
शिवरायाने
जेवढा मंदिराचा
तेवढाच सन्मान केला
मस्जिदीचा शिवाजी राजाने
हल्ली दिवसा ढवळ्या होतायत
खून शिवरायाच्या
स्वराज्याचे
स्वातंत्र्य समता न्यायावर
बलात्कार
आणि गुंतला आहे मावळा
मंदिराच्या बाहेर
दोन्ही हात जोडून
डोकं गहाण ठेऊन
मस्तक पुजाऱ्याच्या
पायावर……
– राजेंद्र क.भटकर
बडनेरा