झेंडा नको धरू
Contents
hide
माय नाही बाप नाही
नाही कोणी दादा भाऊ
ऊठ मर्दा जाग आता
नको निराश तू होऊ !!
वाघिणीच दूध शिक्षण
तू पिऊन पाय जरा
देव वारी दिंडी हंडी
भ्रम दूर होईन सारा !!
मोर्चा, रॅली, मिरोणुका
ह्याच्या नको लागू नादी
नेत्यांसाठी नको करू
जीवनाची बरबादी !!
मोठे सारे खोटे गड्या
नियतीत त्यांच्या खोट
जाती धर्मा पेक्षा मोठं
गड्या तुह्य माहय पोट !!
लाज नको धरू मनी
कामं नाही छोटं मोठं
नको पोटासाठी करू
गड्या कामं खोटनाट !!
स्वार्थासाठी पैशासाठी
हाती झेंडा नको धरू
रोटी बोटी साठी गड्या
मागे मागे नको फिरू !!
कार्यकर्ता फक्त कर्ता
राह्यतो आयुष्यभर
साहेब खातोय लोणी
कार्यकर्ता ताकावर !!
लाथ मार पाणी काढ
ठेव मनगटी जोर
फक्त झुकावे रे बाबा
माता मातीच्या समोर !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556