दिवाळी स्पेशल.!
ओवाळणीच्या ताटात पाचशेच्या नोटा
टाकून झाल्यावर,
त्याने तो कागद पुढे केला
आणि लहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला,
“ताई इथं तुझा..अंगठा हवाय फक्त”
ती म्हणाली
“दादा ये ….वेड्या
आण तो कागद
अंगठाच तर हवाय ना
देते ना भावड्या माझ्या
हा घे अंगठा
पण जाता जाता
एक वचन देऊन जा
वर्षभर आला नाहीस तरी चालेल
दर भाऊबीजेला मात्र न चुकता येत जा..”
माय बाप गेलं
आत्ता माहेरही रुसलं आहे..
मातीतल्या नात्याचं नाव ही
पुसलं आहे..
मुलांना चांदोमामाची ती
रोज गोष्ट सांगते..
मुलं झोपी जातात तेव्हा..
तिच्या डोळ्यात जत्रा
माहेरची पांगते..
सुखी ठेव देवा भाऊराया माझा
नवस रोज मागते..
कित… किती… किती… किती…सांगते
कौतुक भावाचं सासरी..
अन् तिच्या माहेरात
फक्त तिची
वाट पाहते ओसरी…