प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नागरिकांकडून प्राप्त तक्रार अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात यावा. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना पत्राव्दारे कळविण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी संबंधित विभागांना आज येथे दिले.
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. लोकशाही दिनात एकूण 19 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी तक्रारदारांचे म्हणने ऐकुण घेतले. तसेच प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या.
उपायुक्त संजय पवार, कृषी सहआयुक्त किसन मुळे, सहायक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह महसूल, पोलीस, कृषी, महापालिका, सहकार, महिला व बालविकास, समाजकल्याण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.