दिंडी
देवा निघालो निघालो
तुका ज्ञाणीया सांगाती
भोई झालो पालखीचा
हाता बळ देई गती !!
दिंडी चालली चालली
विठुरायाच्या भेटीला
सुखावला वारकरी
हरी नामात रंगला !!
मुखी विठ्ठल विठ्ठल
हरी नामाचा गजर
मिथ्य संसाराचा देवा
मना पडला विसर !!
ऊसळली ऊसळली
भक्ती सागराची लाट
भक्त घेऊन कवेत
वाटे धावते रे वाट !!
मना लागली लागली
देवा आस पंढरीची
ओढ लागली अंतरी
देवा तुझ्या दर्शनाची !!
दिंडी थांबली थांबली
देवा तुझ्या महाद्वारी
द्वार ऊघड मुक्तीचे
नको जन्म मृत्यू फेरी !!
–वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
अकोला 9923488556