संविधान
Contents
hide
अल्ला ने मंदीर पाडल्याचा
आणि रामाने मशीद तोडल्याचा
इतिहास अजून तरी
वाचणात आला नाही
तसा धर्म कुणाला कळलाच नाही
कुणाला अल्ला सांभाळता येईना
कुणाला राम जपता येईना
आमचाच धर्म धोक्यात म्हणून
घोषणा होतात
धर्म वाचवण्यासाठी
दंगली होतात
कुराण आणि गीतेच्या
ओझ्याखाली
इथला माणूस धोक्यात आहे
हे सांगणारं संविधान मात्र
या देशात जिवंत आहे..
बघा ना तुमचा राम
आणि तुमचा अल्ला सुद्धा
खरंतर याच संविधानाने जिवंत ठेवलाय अजूनही
कारण
संविधान लिहिणारा
धर्मावर नाही
तर माणसावर प्रेम करणारा होता
आणि त्याला विश्वास होता
केव्हा ना केव्हा
इथंली मेंढरं माणसं होऊन माणसात येतील
– दंगलकार नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
जि.सांगली.
मो.नं. 7020909521