पुणे प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सध्या जो काही पेच सुरू आहे तो निवळण्याचं नाव घेत नाही तोच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वाहिनी ला मुलाखत देताना म्हंटल आहे. अजित पवार यांनी मागील आठवड्यात त्यांच्यावर आपल्या मुलाखतीत केलेले आरोप त्यांच्या चांगले जिव्हारी लागले असून ,काँग्रेस मधिल अनेक नेते हे हा राष्ट्रवादी चा अंतर्गत मुद्दा असून तो सोडवण्यासाठी ते समर्थ आहेत अस जरी म्हंटल असताना चव्हाण यांनी मात्र गँभीर आरोप लावले आहेत.
कोर्टाचा निकाल आला आणि जर सोळा आमदार दोषी आढळुन त्यांच्यावर कारवाई झाल्यास ,सरकार सावरण्यासाठी राष्ट्रवादी महत्वाची भूमिका बजावणार असून तशी बोलणी ही दिल्लीत सुरू असल्याचे चव्हाण यांनी म्हंटल आहे. राष्ट्रवादी किती ही नाकारत असले तरी हे सत्य असून काही दिवसात ज्या वेळी निकाल हाती येईल त्या वेळी जनतेसमोर सगळं येईलच
अस ही ते म्हणाले आहेत.
अस जर काही झालं तर मात्र राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ होणार असून आघाडीत ही बिघाडी तर होईलच परंतु भाजप साठी मिशन २०२४साठी राष्ट्रवादी शी युती फायदेशीर ठरेल का याची फडताळणी ही होत असून भले ही राज्यात राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री जरी असला तरी राज्यातून मात्र जास्तीत जास्त खासदार भाजप साठी निवडणू येणं फायदेशीर राहणार आहे.ह्या वेळी केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही हे भाजप ही ओळखून आहे. त्या मुळे चव्हाण जे म्हणतात त्यात तथ्य आहे का हे काही दिवसात समजेलच..!