स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्तता 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा
समाज कल्याण विभागाचे आवाहन
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी) : सहायक आयुक्त समाज कल्याण, अमरावती या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2020-21 व सन 2021-22 या वर्षासाठी सन 2022-23 या वर्षातील अर्ज अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचे अर्ज सादर केलेले आहे.
या अर्जाची तपासणी व पडताळणी केली असता काही विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्राअभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेत. तेव्हा असे प्राप्त अर्ज निकाली काढण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती या कार्यालयास सादर केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी या कार्यालयास दि. 10 नोव्हेंबर 2023 दिनांकाच्या आत कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून त्रुटीत असलेल्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी कार्यालयास संपर्क साधावा. त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे.
स्वाधार योजनेतील अर्जातील त्रुटी पूर्ण करण्याची अंतिम मुदत दि. 10 नोव्हेंबर 2023 ही असून त्रुटी पूर्ततेची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची राहील. याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.