महानगरपालिकेतर्फे शहरातील परिसरात स्वच्छता मोहीम
महानगरपालिकेकडून परिसरात धुवारणी व फवारणी मोहीम
अमरावती (प्रतिनिधी): अमरावती शहरात मागील काही दिवसांत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून अमरावती शहरातील प्रभागामध्ये तातडीने घरोघरी, प्रभागातील परिसरात धुवारणी व फवारणी करावी असे निर्देश सर्व जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक व स्वच्छता कंत्राटदारांना देण्यात आले होते. याच दरम्यान शहरात मच्छरांचाही प्रादुर्भाव वाढत असून यामुळे डेंग्यु, मलेरिया आणि इतर साथ रोगांची शक्यता तीव्र प्रमाणात वाढू नये या अनुषंगाने स्वच्छता विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागलेला आहे. स्वच्छता कंत्राटदारांच्या फवारणी व धुवारणी यंत्राद्वारे शहरातील विविध प्रभागामध्ये धुवारणी व फवारणी करण्याकरीता दिनांक २६ ऑक्टोंबर,२०२३ रोजी मोहीम राबविण्यात आली. तसेच नागरिकांची स्वच्छतेबाबत तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे.
प्रभाग क्र.१६ अलीमनगर/रहेमत नगर येथील स्वास्थ अधीक्षक यांच्याकडून प्राप्त वृत्तपत्राद्वारे मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जेष्ठ स्वास्थ निरीक्षक यांच्या उपस्थितीत तसेच तक्रार करता माजी नगरसेवक अब्दुल रफिक अब्दुल रज्जाक यांच्या उपस्थितीमध्ये रोशन नगर, अलीमनगर, कलीम कॉलनी, रहेमत नगर मध्ये नाली सफाई, झाडू सफाई, जेट मशीनद्वारे रपटा तसेच फवारणी करण्यात आली. मनपाद्वारे कंत्राटदार मार्फ़त प्रभाग क्र.१६ अलीमनगर मध्ये अतिरिक्त सफाई कामगारद्वारे सुन्नी मस्जिद परिसर, अलामा इक्बाल शाळा परिसर, गुलदार नगर परिसरात स्प्रे-फवारणी करण्यात आली व डेंगू आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.
मा.आयुक्त व मा.उपायुक्त (प्रशा.) यांच्या निर्देशानुसार, मा.सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर झोन क्र.२ यांच्या सूचनेप्रमाणे मध्य झोन क्र.२ राजापेठ अंतर्गत मैन रोडची साफ सफाई करण्यात आली तसेच खाटीकपुरा, चोबल प्लॉट परिसरात नाली सफाई कामगारांमार्फत करण्यात आली.