चितनात मुंगी …!
चिटी जब दाना लेकरं जब चलती है.
चढती दिवांरोपर सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगोमे साहस भरता है
चढकर गिरना ; गिरकर चढना निखरता है.
उसकी मेहनत बेकार नहीं होती.
कोशीश करने वालोंकी हार नहीं होती !!
जेष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांची ही एक सुंदर मनलुभावणारी रचना. एक बारीक निरीक्षण करतांना दाखला घेतलाय मुंगीचा . होय याच मु़गीचया श्रमाचा ;एकीचा आणि सहकार्याचा धागा महत्वाचा.धान्याचा एक कण ही मिळताच तो संदेश सहकारी मित्रांना मिळतो. तो कण वाहून नेणारी प्रमुख पुढे असते आणि मागे शिस्तीत सवंगडी. कण. सुटला तर इतर लगेच धावून येतात. ही धडपड असते कुटूंब उपजिविकेसाठी . एकजुटीने. जबाबदारी ओळखून. समाजाला दिलेला अचुक संदेश..
एका निरीक्षणानुसार अनेक प्रकारच्या मुंग्या असल्या तरी सर्वांना एकच शिस्त. हे निरीक्षण म्हणते शिस्त मानसाला लावावी लागते मुंग्यांना नाही.हिच गोष्ट संतांनी हेरली अआणि उदाहरणे दिल्या खेरीज माणसाला ज्ञान मिळणार नाही. म्हणूनच मुंगी सारख्या लहान पण कल्पक जीवाचे रुपक घेवून त्यातील मर्म लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न भजन किर्तनातून केलेला आहे. आज जगात अहंपणा मोठेपणा मिरवला जातो. इतरांवर अधिपत्य कसे गाजवता येईल हा हेतू असतोच. पण असा मोठेपणा मिरवित बसण्यापेक्षा संत तुकाराम महाराज लहाधपणाला महत्व देतात.
लहानपण देगा देवा.
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर
त्याला अंकुशाचा मार !!
छोटयाशा कणातच मुंगी समाधान मानणे उगीच डोईजड कणांची ती अपेक्षा न करता. समाधानी जीवन जगण्यात सामंजस्य आहे. उगीच पोकळ गमजा मारत बेगडी मोठेपणा मिरवण्यात अर्थ नाही. हा संदेश सुज्ञांसाठी. समाजातील गरीब – श्रीमंत ही दूरी तशी जुनी समस्या असली तरी आज यातच वाढ होत आहे. पण सर्वांनी पाहिजे तेच आणि तितकंच घेतल तर.? हिच भावना संत नामदेव मांडतात.
मुंगीने नेले हे कण वदनात.
तीने आपुल्या सदनात कुटूंब पोषिले !
मुंग्यांची एक गम्मत असते बघा. समजा तुमच्या स्नानगृहात मुंग्यां जमा झाल्या आहेत. गरम पाण्याने त्यांना इजा होईल ; त्या मरतील या भावनेने आपण त्यांना दूर करतो. दूर झालेल्या मुंग्या परत काही दिवसा़नी या ठिकाणी एकत्र आलेल्या दिसतील. याचे कारण आज जरी आपण चकाचक घरात ; बंगल्यात राहायला आलो असलो तरी ती मुळ जमीनीवर शेती;जंगले होती. तेथे मु़गीसह आहे तर जीव सुखनैव राहातं होती. मुकी बिचारी कुणीही हाकलावीत. या विचाराने त्याना दूर केले.
असले तरी मुळ सातबारा आपला आहे हे कसे विसरले जाईल. पण आपल्या सैबत तुम्ही ही राहायला हरकत नाही या भावनेतून त्रास न देता त्या नवीन आलेले रहिवासी आपलेच आहेत या भावनेतून सहजीवन ही कल्पना कृतीतून त्यांनी मांडण्याचा हा प्रयत्न समजायला हवा.
या सूक्ष्म जीवाला पोथी पुराण कसे वाचता येणार या समजात अडकलेल्या माणसाला मुंगी गुढ तत्वज्ञानाचे प्रतीक असल्याची जाणीव अवघडच. सतानी उपदेश करताना मुंगी या रुपकाचा चपलखतेने वापर केला आहे. सृष्टीत परब्रह्म आहे ही बाब मान्य करतांना त्यांतील तत्वाकङे कशी ङोळेझाक करणार ? सूक्ष्माती सूक्ष्म तत्वाचे ज्ञान जेव्हा होते तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो असे समजल जात. मला अति सूक्ष्म तत्वज्ञान गुरू कारणाने झाले असल्याची भावना असा भाव स़त मुक्ताई व्यक्त करतात.. हे स्पष्ट करताना त्या दाखला देतात मुगीचा. !
मुंगी उडाली आकाशी.
तीने गिळले सूर्याशी.
वाझे पुत्र निपजले.
विचू पाताळाशो जात
शेष माथा वदनी पाय
माशी व्याली घार झाली
देखोनी मुक्ता ई हासली!!
आत्मभान अनुभूतीची हा परिणाम चोख रित्या लिहिला गेलाय. कोठेही बङेजाव नाही. रोजच्या जिवनातील शब्द पण यातून किती मार्मिकतीने मार्ग दाखविला आहे. अगदी सहजतेने. साघी मुंगी काय करू शकते हे ठळकपणे दाखविले आहे.
पण योग्य तत्वाने चालेल तो माणूस कसला ? आपल्या हावरटपणामुळे,आधाशी वर्तनाने जगभर पर्यावरणावर अधिकार गाजवतोय . जमीन ,पाणी जंगले यावर अधिकार गाजविताना पशु पक्षी जनावरे संपवली जात आहेत . विकासाचे नावाखाली आपण जमिनीचे लचके तोडत असल्याचे भानही राहिलेले नाही. दरसाली सात सेंटीमिटर भूजलाची पातळी घसरत आहे. सुमारे 44 टक्के जनावरे माणसामुळे नामशेष होण्याचे अंदाज केला जात आहे आणि गंभीर चेहरे करून परिसंवाद आयोजले जात आहेत. चिंता दाखविली जात आहे. बस्स या पुढे काही घङत नाही. परंतु विठोबा खेचला सारखी लोकहित जाणारे आणि जाणारे विरळाच. त्यांचा सेवा भाव ङोळयात अंजन घालणारा. एकनाथ महाराज म्हणतात ‘मुंगी उमगली खेचरा संगे. हा सहजभाव समजणे सोपे नाही. कारण या वेगवान युगात माणूस नुसतच मशिनच बनत चाललाय एव्हढंच नाही तो मशिनचे . स्वाधीनच हैतचाललाय आळशी आणि परावलबी. ही बनतो आहे. तयाला काही जाणिवा तरी उरलीय आहे का हा विचार करताना कवी मर्ढेकरांची कविता आठवते.
मी ऐक मुंगी तु एक मुंगी
सात इथल्या सात तिथल्या
या नच मुंगी नुसती माणसं!!.
कोण कुठे भरला जाईल याचा भरवसा नाही. कोणताच मेळ नाही. मग हिशेब कसला ? ही धावाधाव कशासाठी हा अनुत्तरीत सवाल माणसाला भेङसावतोय याचे उत्तर शोधण्यात गुंतलाय. आपली मागणी ,विनंती भक्तीभावाने ईश्वरा कडे मांडतो आहे. परेशान झालाय तो. हाच धागा पकडून कबीर मुंगीचा दाखला देतात. जर मुंगीचे पायातील पैंजणांचा आवाज भगवंताला पोहोचत असेल तर माझी हाक देवाच्या कानी कशी जाणार नाही. तो दोहा असा आहे.
मस्जिद मे मुल्ला पुकारे
क्या साहेब तेरा बहिरा है
किसीके ट नुपूर बाजू
सो भी साहेब सुनीता है !!
पंडीत होय केवळ आसन मारे
लंबी माला जपता है
कहती कबीर सुनो भाई साधी
हरि जिसको तैसा है !!
मुंगी हळुहळु शेकडो मैल चालू शकते पण चालण्याची ईच्छा नसलेला गरूङ एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही. या अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे. माणसाने कशा प्रकारची मुंगी व्हायघे आहे हा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आपणांवर सोडून हा विचार येथे थांबवतो.
– राजेंद्र चुतर
पदमविलास अपार्टमेंट, बाहेर पाषाण लिंक रोड
पुणे 411021