मराठी भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अमरावतीच्या भूमिपुत्राला मान
अमरावती (प्रतिनिधी) : देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या हंगामी कुलगुरुपदाचा मान अमरावतीच्या भूमिपुत्राला मिळाला आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्या निर्मितीचे काम गतीने सुरू आहे.याच मराठी विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मूळचे अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील काठी येथील डॉ.अविनाश आवलगावकर यांची निवड केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी विद्यापीठाची मागणी करण्यात येत होती. अनेक भाषांची विद्यापीठ भारतामध्ये निर्माण झाली आहेत. तेलगू, तामिळ, हिंदी, संस्कृत, कन्नड इत्यादी भाषांचा समावेश यात करता येईल. पणं, मराठी भाषेचे विद्यापीठ नव्हतं. मराठी भाषेच साहित्य ज्या पवित्र भूमीत निर्मित झालं. त्याठिकाणी हे विद्यापीठ आकारला येत आहे, त्याचा विशेष आनंद आहे, अशी भावना आवलगावकर यांनी
वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.