भाकर
चतकोर भाकरी साठी
कवठाभर
लाकड
नेत होती
माय तू
पाटलाच्या वाड्यावर ….
झांपर
होत की नाही
दिसत ही
नव्हत
फाटक्या लुगड्यात,..
घाम बंबाळ
व्हायची तू
डोक्याच्या केसांपासून
ते
पायाच्या नखालोग
तुझ्या त्या
घामाचा वास
अजूनही दरवळतो
माझ्या आलिशान
बगल्यात
अन्
अस्वस्थ करते मला
माझा वातानुकूलित
बंगला…
– राजेंद्र क. भटकर
“राजगृह “, अलंकार पार्क बडनेरा, अमरावती
ReplyForward |