भाजपच्या राज्यात भाजपचाच खासदार सुरक्षित नाही.!
भाजपच्या राज्यात भाजपचाच खासदार सुरक्षित नाही.!
Contents
hide
डॉ. अनिल बोंडे यांच्यावरील हल्ला म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे.!
अमरावती (प्रतिनिधी) : भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्यावर झालेला दगड हल्ला अत्यंत निषेधार्ह असून असा हल्ला लोकशाही व्यवस्थेस घातक आहे. या प्रकाराची विना विलंब चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली असून भाजपाच्या राज्यात जिथे भाजपाचाच खासदार सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल याची कल्पनाही न केलेली बरी असे सांगून या प्रकरणात काँग्रेस आमदार यशोमती ताई ठाकूर यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते असेही दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
डॉ. अनिल बोंडे यांच्यावरच नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या , कोणत्याही नेत्यावरच काय सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य माणसावरही असा हल्ला होणे निषेधाचीच बाब असल्याचे नमूद करून खा.अनिल बोंडे यांच्यावरील दगडफेक गृह खात्याच्या कारभाराच्या चिंधड्या उडाल्याचा स्वयंघोषित पुरावा असल्याचे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
भाजपच्या राज्यात जिथे भाजपचाच खासदार सुरक्षित नाही तेथे सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे ,राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे ,राज्यातील गुन्हेगारी व गुंडगिरी वर नियंत्रण आणण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह खाते अत्यंत कुचकामी ठरत आहे अशी टीका दिलीप एडतकर यांनी केली आहे. अमरावतीतच नव्हे तर एकूणच राज्यात गृह खात्याची प्रतिमा अत्यंत मलीन झाली असून एखाद्या सक्षम मंत्र्याकडे गृह खात्याचा कारभार सोपवण्याची गरज असल्याचे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
सर्वात कळस म्हणजे डॉ. अनिल बोंडे यांच्यावर तिवसा येथे दगडफेक झाल्यामुळे तिवसा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार यशोमती ताई ठाकूर यांच्या विरुद्ध काही भाजपच्या पाव शहाण्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या या घटनेचे भाजप राजकारण करीतअसून डॉक्टर अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक करणारा मग तो कुणीही असो त्याचा शोध घेऊन त्याला गजाआड करण्याची मागणी करण्याऐवजी बुद्धयांकाच्या प्रदेशात कुपोषित असलेल्यांनी नको तिथे नसलेली अक्कल पाजळली आहे ,असे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
———————————————————
बैलांनी बैलावर उधळलेलली ढेकळं तर नव्हेत ?
शंकर पट सुरू असताना बैलांनी घेतलेल्या धावे मुळे ढेकळे उडाली आणि ती डॉ. बोंडे यांना लागली अशी ही एक माहिती असून तसे असेल तर बैलांनी बैलावर उधळलेले ढेकळं असं या प्रकाराचे वर्णन करावं लागेल त्याचप्रमाणे हा संपूर्ण प्रकार ड्रोन कॅमेरा बंदिस्त झाला असून २४ तास उलटून गेल्यानंतरही ड्रोनची चित्रफीत अद्याप पोलिसांना मिळालेली नाही यावरून खरोखरच दगड फेक झाली की बैलांनी बैलावर उधळलेली ती ढेकळं होती याचीही चौकशी पोलिसांनी करावी.
-दिलीप एडतकर
प्रदेश काँग्रेस प्रवक्ता
————————————————————-