फेक कॉलपासून सावधान.!
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फेक कॉल येत असतील तर तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचे खूप आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण काही लोक तुम्हाला फेक कॉल करून फसवू शकतात आणि तुमचे बँक डिटेल्स घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. सायबर दरोडेखोराचा एक कॉल तुमचे आयुष्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला फेक कॉल येतो तेव्हा तुम्ही सावध राहावे. याच्या मदतीने तुम्ही सायबर फसवणूक टाळू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्या फोनमध्ये 2G, 3G किंवा 4G सिम अपग्रेड करण्याचा कॉल येत असेल किंवा तुमची मुलगी,मुलगा सेक्स रॅकेट मद्ये फसला गेला आहे.. त्याला सोडायचे असेल तर लाखो रुपयांची मागणी करणारे कॉल आला तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. हा एक बनावट कॉल असू शकतो, ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरीला जाऊ शकतात. किंवा एक कॉल च्या नावावर तुम्हाला लाख रुपये ट्रान्सफर करावे लागतील..
खोट्या फेक कॉलमुळे आग्रा येथील एका शिक्षिका महिलेलान आपला जीव गमावला गमवावा लागला.
तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे. आम्ही तिला ताब्यात घेतलं आहे. जर तिला सोडवायचं असेल तर एक लाख रुपये पाठवा.ठ असा फोन कॉल एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेला आला. ज्यानंतर या शिक्षिका प्रचंड तणावात आल्या. त्यांच्या हृदयावरचा ताण वाढला आणि हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी कुठल्याही सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली नव्हती. मात्र डिजिटल अरेस्टच्या फेक कॉलमुळे या शिक्षिकेला तिचा जीव गमावावा लागला.
डिजिटल अरेस्टची ही घटना आग्रा या ठिकाणी घडली आहे. डिजिटल अरेस्ट हा एक प्रकारचा फ्रॉड कॉलचा प्रकार आहे. सायबर गुन्ह्यांमधल्या गुन्ह्यात या घटनेची भर पडली आहे. आग्रा या ठिकाणी घटना घडली. पोलीस निरीक्षक दीपांशू राजपूत यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार मालती वर्मा या शिक्षिकेचा डिजिटल अरेस्टमुळे मृत्यू झाला. त्यांनी हेदेखील सांगितलं की ज्या कॉलरने मालती वर्मा यांना फोन केला त्याने स्वतः तो पोलीस निरीक्षक असल्याचं सांगितलं. तसंच एक लाख रुपये द्या म्हणजे तुमच्या मुलीला आम्ही सेक्स रॅकेटमधून सोडवू अशी मागणी त्याने केली. वास्तवात हा फेक कॉल होता. मात्र घडलेल्या घटनेचा ताण येऊन मालती वर्मा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला
तुमच्यासोबत कोणतीही ऑनलाइन फसवणूक झाली तर काही प्रमाणात तुम्हीही त्याला जबाबदार असाल. कारण तुमच्या मनात लोभ येतो. म्हणून, विचार करूनच बनावट कॉल उचला अन्यथा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता.सायबर दरोड्याच्या अनेक प्रकरणे दररोज नोंदवली जातात, म्हणजेच एका महिन्यात २०० हून अधिक प्रकरणे नोंदवली जातात आणि बहुतेक प्रकरणे बँक फसवणुकीशी संबंधित आहेत.
बँक फसवणुकीसाठी हॅकर्स कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तुमचा डेबिट कार्ड नंबर आणि पिन नंबर घेतात. ते तुमच्या मोबाईल नंबरवर मिळालेला मागतात. केवायसी अपडेटबद्दल विचारून, ते खाती निलंबित करण्याची किंवा कॅशबॅक किंवा इतर प्रकारच्या ऑफरचे आमिष दाखवण्याची धमकी देतात. ज्यांच्या चर्चेत तुम्ही तुमचा तपशील सहज देऊ शकता. जेव्हा सायबर दरोडेखोर तुमचे बँक खाते रिकामे करतात, तेव्हा तुमच्याकडे पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय राहत नाही.
बनावट कॉल कसे टाळायचे
जर तुम्हाला तुमचे सिम अपग्रेड करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही ज्या मोबाईल ग्राहक कंपनीची सेवा घेत आहात त्या कंपनीची वेबसाइट तपासा आणि ती कंपनी अशी काही सुविधा देत आहे की नाही ते पहा. तुमच्या मोबाईल ग्राहकाच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करूनही माहितीची पुष्टी केली जाऊ शकते. याशिवाय, तुम्ही तुमच्या सिम किंवा ऑफरशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी मोबाइल कंपनीच्या स्टोअरलाही भेट देऊ शकता. बँकेशी संबंधित माहितीबाबत कोणताही खोटा कॉल आल्यास फोनवर कोणतीही माहिती देऊ नका. जर तुम्हाला बँकेशी संबंधित माहिती मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेतील बँक मेनमध्ये जाऊन कोणतीही माहिती मिळवू शकता. कारण बँकेच्या नियमांनुसार बँकेचा कोणताही कर्मचारी फोनवर तुमच्याकडून बँकेशी संबंधित माहिती घेऊ शकत नाही. त्यामुळे फेक कॉल्सपासून सावध रहा.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६