…. बेटी आप आ गयी
मै आपका इंतजार कर रहा था..दोन दिवसापूर्वी मी बनारस ला गेले होते त्याबद्दल लिहीलेही होते , व्हीडीओ , फोटो शेअर केले होते ..तिथे घडलेला एक किस्सा मी त्यात नमुद केला नव्हता..
गंगेत न्हाहुन येवुन पितरांची शांती केली आणि घाटाच्या पायऱ्या चढुन आम्ही वर आलो.. पितृपंधरवड्यामुळे घाटावर बरीच गर्दी होती.. गंगेत आंघोळ केल्याचं समाधान होतं.. ऑक्टोबर हीट मधे ही फ्रेश वाटत होतं..थोडं पुढे आल्यावर आम्ही लस्सी प्यायला निघालो तितक्यात एक बाबाजी समोर आले म्हणुन मी थबकले.
…… त्यांची वाढलेली दाढी आणि थोडे मळकट कपडे , काही क्षणात ते बोलले बेटा आप आ गयी मै आपकाही इंतजार कर रहा था , मला काही कळायच्या आत आणि मी त्यावर काही तरी बोलणार इतक्यात माझ्या सोबत असलेल्या प्रभूजीनी मला हाक मारली , मी मागे वळुन पाहिलं आणि पुन्हा समोर बाबाजीकडे पाहिलं तर तिथे कोणीच नाही..मी आजूबाजूला पाहीलं तर इतर लोक दिसत होते पण बाबाजी ??
….. मी प्रभुजीना म्हटलं , ते बाबाजी कुठे गेले ?? ..त्यांना किस्सा सांगितला तर ते म्हणाले , आम्ही कोणालाच तुझ्याशी बोलताना पाहिले नाही .. तुला काहीतरी भास झाला असेल..
मी म्हटलं सकाळचे ११ वाजले आहेत आणि भास कसा होइल ??.. मी पुढे चालायला लागले मधेच दोन वेळा मागे वळुन पाहिले तर तसं कोणीच दिसेना पण उन्ह लागत होतं म्हणुन मी थोडी फास्ट चालायला लागले तर माझ्यावर उन्ह लागु नये म्हणुन कोणीतरी छत्री धरलेय असं जाणवलं.माझ्या लक्षात आलं की ही सगळी त्या भगवंताची कृपा आहे.. त्यावेळी मात्र मी मनातच कृष्णाला आठवलं आणि हरे कृष्ण म्हटलं आणि तो किस्सा मात्र कोणालाही सांगितला नाही जो आज तुमच्याशी जसाच्या तसा शेअर करतेय..
काशी यात्रेची सुरुवात घरातुन निघाल्यापासुन विमानाने झाली पण एकही मिनीट फ्लाइट उशीरा नाही की इतकं उन्ह लागूनही साधं डोकही दुखलं नाही .. ना कसला त्रास झाला येतांनाही एअरपोर्ट वरुन घरी यायला कॅब चा संप होता.त्यामुळे माझ्या मित्राने आदल्या दिवशी मला मेसेज केला आणि म्हणाला , कॅबचा संप आहे त्यामुळे मी तुला पिकअप ला येतो.. त्याच्या दर्शनासाठी जाऊन घरी परत सुखरूप यायला त्याने सगळी सोय करुन ठेवली होती…
मला वाटतं , हे वाचल्यावर मी कोणालाही काहीही सांगायची गरज नाही .. तरीही सांगते हरीनाम घ्या .. त्याला माहीत असतं आपल्याला काय हवय.. योग्य वेळी योग्य गोष्ट तो देतो .. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा आणि प्युअर हार्ट ने आपल्याला नेमुन दिलेलं काम करत रहा.. जीवन खूपच सुंदरआहे .. भगवंताच्या नामस्मरणाने ते अजुन सुंदर करा..
( तळटिप..
एकीकडे ईश्वराचे नामस्मरण तर दुसरीकडे भौतिक व शारीरिक सुखांची ओढ असे दुहेरी व्यक्तिमत्त्व आपल्यात पाहायला मिळते ,नेमके खरे कोणते ते समजायला मार्ग नाही .खरे तर ईश्वरचरणी लिन झालेला माणूस ऐहिक सुखांपासून स्वताला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो .आपण आपली ओळख दोन्ही रूपांत करून देता जे अशक्य आहे .म्हणजे एकीकडे लैगिकतेवर किंवा तत्सम गोष्टींवर भरभरून बोलायचं आणि दुसरीकडे देवाचं नामस्मरण करत पवित्र असल्याचा भास निर्माण करायचा हा खूप मोठा विरोधा भास आहे ज्याचं स्पष्टीकरण आपणच देऊ शकता.. हा माझ्या प्रिय वाचकाचा मेसेज .. त्याला आजचा माझा लेख हेच उत्तर आहे आणि लैगिकतेवर काम करणं किवा त्याबद्दल ज्ञान देणं हे मला भगवंताने नेमुन दिलेलं काम आहे..
-सोनल गोडबोले